लंडन : कायली जेनर ही अमेरिकेतील एक स्टार अभिनेत्री आणि मॉडेल. नुकतीच तिने सूत्रांसोबत मनातील भावना व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांना दिलेल्या माहितीत कायली म्हणते, आज मी यशस्वी आहे. खूप नाव कमावले आहे. प्रसिद्धही आहे. पण, हे सारे कमावत असताना मी बरेच काही गमावलेही आहे. या क्षेत्रात तुमचे यशस्वी होणे ही एक अशी जागा आहे की, तुम्हाला तुमची इमेज नेहमीच टॉपला रहावी यासाठी सतत एक एका दबावात काम करावे लागते.


आपली भावना अधिक विस्ताराने सांगताना कायली म्हणते, लोकामंध्ये सतत चर्चेत आणि प्रसिद्धीत रहावे यासाठी मी इन्स्टाग्रामवर आहे. केवळ लोकांच्या मनोरंजानासाठी मी इन्स्टाग्रामवर आहे. तिथे माझे काही दोस्तही आहेत. तुमचे चर्चेत असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी कायलीची धारणा आहे.


कायली म्हणते, मला वाटते की, माझ्या आयुष्यात मी बरेच काही गमावले आहे. खास करून माझा आनंद. जेव्हा मी केवळ १४ वर्षांची होते तेव्हा, मी मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करत असे. पण, तुम्ही जेव्हा मोठे होऊ लागता तेव्हा तुमच्या या कृतीबद्धल सर्व लोक नकारात्मकच बोलायला सुरू करतात.


महत्त्वाचे असे की, जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने कायलीचा जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या १०० व्यक्तींमध्ये समावेश केला आहे. १९ वर्षीय कायलीची वार्षीक कमाई ४१ मिलीयन डॉलर इतकी आहे. सर्वात कमी वयात श्रीमंत होण्याचा मानही तिच्याच नावावर आहे.