मुंबई :  अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने तिच्या डान्सने (amruta khanvilkar dance) प्रत्येकाला थक्क केलं आहे. 'वाजले की बारा', 'चंद्रा' (chandramukhi) अशा एकापेक्षा एक लावण्यांवर ठेका धरत अमृताने चाहत्याने (amruta khanvilkar's fan ) तिच्या तालावर थिरकायला भाग पाडलं आहे. कायम डान्समुळे चर्चेत असणारी अमृता आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका व्यक्तीने अमृतासाठी खास मेसेज लिहिला आहे. फोटोमध्ये अमृतासोबत एक पुरुष दिसत आहे. त्यानेच स्वतःच्या इन्स्ट्राग्राम स्टोरीवर अमृतासोबत खास फोटो शेअर केला आहे. 



अमृतासोबत फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये , 'माझ्याकडे तू आहेत, म्हणून मला कशाचीच काळजी नाही. धमाकेदार डान्स करू...' असं लिहिलं आहे. अमृतासोबत स्टोरी शेअर करणारा पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून कोरिओग्राफर (choreographer) प्रतिक उतेकर (Pratik Utekar) आहे.  (amruta khanvilkar with Pratik Utekar)


प्रतिक आणि अमृताने 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) या डान्स शोमध्ये एकापेक्षा एक परफॉर्म्स देवून प्रेक्षकांना थक्क केलं आहे. अमृताने देखील प्रतिकसोबत अनेक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.