प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझाला 2020 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. कोरिओग्राफर पुनीतच्या लग्नाच्या दिवशी हा सर्व प्रकार घडला. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादिवशी रेमो पत्नी लिझेलने म्हणाला 'मी तुला सोडून...' नेमकं त्या दिवशी काय घडलं याबद्दल इनसाइड स्टोरी लिझेलने सांगितली आहे. 


हृदयविकाराच्या दिवशी सकाळी नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती आणि हर्षच्या LOL पॉडकास्टवर रेमो डिसूझा आणि लिझेल आली होती. त्यावेळी रेमो ज्यादिवशी हृदयविकाराचा झटका आला तो क्षण आठवून ती भावूक झाली. त्यादिवशी सकाळी उठल्यापासून काय काय झालं याबद्दल तिने सगळं इथे सांगितलं. त्यादिवशी ते सकाळपासून पार्टीसाठी तयारी करत होते. पण नंतर अचानक रेमोची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 


रेमो म्हणाला ती सकाळ इतर दिवसांच्या सकाळसारखी होता. पण हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्याने जितका व्यायाम केला होता तितका कधीच त्याने केला नव्हता. बाहेरच काही खात नाही पण तरी मला असं झालं खूप झालं आता...त्यानंतर लिझेलने सांगितलं त्याला हॉस्पिटलमध्ये कसं नेण्यात आलं. 


लिझेलने सांगितले की, त्या दिवशी कोरिओग्राफर पुनीतचं लग्न होतं. आम्ही सकाळी जिमला गेलो, त्यानंतर आम्ही लग्नासाठी जाणार होता. त्या दिवशी आमचा ट्रेनर घरी आला, त्याने मला वर्कआउट करायला सांगितलं, पण मी त्याला नाही म्हटलं. मात्र, त्यांनी मला पुन्हा विचारल्यावर मग मात्र मी वर्कआऊट सुरु केला. रेमो ट्रेडमिल करत होता. त्यानंतर तो अचानक खाली बसला. लिझेल पुढे म्हणाली की, माझं वर्कआउट संपल्यानंतर मी वॉशरूममध्ये गेले पण जेव्हा मी परत आले तर मी रेमोला खाली बसलेलं पाहिलं. 


'मी तिला विचारलं, तुला काय झालं, तेव्हा तो म्हणाला काही तरी अडकल्यासारख वाटतंय. मला वर्कआऊट कराव वाटत नाही आहे. रेमोने सांगितले की, जेव्हा मला वेदना जाणवू लागल्या तेव्हा मी सरळ खाली झोपलो, पण त्यामुळे काहीही फरक पडला नाही. मग मी उलटा झोपलो, तरीही काही फरक पडला नाही. 


मग मी उठून बसलो तर ट्रेनर म्हणाला की सर चला सुरु करुया. पण मी हालचाल केली नाही. त्यानंतर जीम ट्रेनरला कळलं की मी खरंच अस्वस्थ आहे. यानंतर रेमो आणि लिझेल लिफ्टमध्ये गेले आणि त्यांनी 12व्या मजल्यासाठी बटण दाबल. तो परत लिफ्टमध्ये खाली बसला. घरी पोहोचताच पत्नीने त्याला ॲसिडिटीसाठी औषध हवे आहे का असं विचारलं पण रेमोने नाही म्हटलं. लिझेलने घड्याळ काढली आणि हातावर ठेवून ईसीजी चालू केला. दोनदा तपासल्यानंतर रेमोच्या तब्येतीत काहीतरी गडबड असल्याच तिला जाणवलं. 


यानंतर लिझेलने तिच्या मित्रांना फोन केला पण कोणीही फोन उचलला नाही. लिझेलने गाडी काढली स्वत: चालवत ती हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. रस्त्यात तिला एक मित्र भेटला तिलाही तिने गाडीत घेतलं आणि ते हॉस्पिटलला पोहोचले. 


हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर लिझेलला कळलं की रेमोला हृदयविकाराचा झटका आलाय. लिझालला कळताच तिने पहिला फोन वरुण धवनला लावला. तो डॉक्टरशी बोलला. त्यानंतर तिने सलमान खानला फोन लावला. संपूर्ण शस्त्रक्रिया होईपर्यंत सलमान खान तिच्या आणि डॉक्टरचा संपर्कात होता. 


त्यावेळी रेमो पत्नीला म्हणाला...


भारती आणि हर्ष यांच्याशी बोलत असताना भावूक होत लिझेल म्हणाली की, जेव्हा रेमोला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जात होते, तेव्हा मी त्याचा हात धरला आणि त्याला काळजी करु नकोस असं सांगितलं. त्यानंतर रेमो म्हणला की, मी तुला सोडून जाणार नाही. लिझेल म्हणाली की, त्यावेळी मला माहित होत की काहीही चुकीचे होणार नाही. लिझेल हे सांगत असताना भारतीही भावूक झाली आणि दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते.