मुंबई :  'थपकी प्यार की' आणि 'शक्ती: अस्तित्व के एहसास की' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेली अभिनेत्री जिग्यासा सिंह बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. अद्याप तरी तिने कोणतेट नवीन प्रोजेक्ट साईन केलेले नाही. अभिनेत्रीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जिग्यासा सिंगने 2022 मध्ये 'थपकी प्यार की 2' मध्येच सोडली आणि तेव्हापासून ती अभिनयापासून दूर आहे. जेव्हा अभिनेत्रीने हा शो सोडला तेव्हा असं पसरवण्यात आलं की, ही अभिनेत्री नखरे करत आहे.  आणि तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तिने हा शो सोडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिग्यासा सिंहने आता आपली बाजू मांडली आहे. शो सोडण्यामागचं खरं कारण काय होतं हे आता तिने सांगितलं आहे. त्या अफवांचा तिच्या तब्येतीवर किती वाईट परिणाम झाला हेही जिग्याने सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये बसून ती रोज रडायची.


'लोकांमध्ये अजूनही खूप गैरसमज आहेत'
जिग्यासा सिंहने 'टेली चक्कर'ला सांगितलं की, 'या सगळ्या काळात मला माझी बाजू लोकांना सांगण्यासाठी व्यासपीठ मिळालं नाही. माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. मला वाटतं की, मी 'थपकी प्यार की 2' सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात काय घडलं हे माझ्या प्रेक्षकांना कळायला हवं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आता मी मी बोलतेय.


'ती गाडीत बसून रडायची, औषध घेऊन शूटिंगला जायची'
जिग्यासा सिंहने 'थपकी प्यार की' मधून अभिनयात पदार्पण केलं, त्यानंतर ती 'शक्ती: अस्तित्व के एहसास'मध्ये दिसली. 'शक्ती'मध्ये काम करत असतानाच 'थपकी'चा दुसरा सीझन सुरू झाला, ज्यामध्ये अभिनेत्रीने काम करायला सुरुवात केली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला विश्रांतीची संधीही मिळाली नाही.  स्वत:ला शूटमध्ये आणणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. स्थिती अशी झाली की, कित्येकदा ती गाडीत बसायची आणि जोर-जोरात रडायची. काही महिन्यांनी जिग्यासा सिंहच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती औषधे घेऊन सेटवर यायची आणि तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं जात होतं. जिज्ञासा म्हणाली की ती दिवसातून फक्त 7 तास जिज्ञासा असायची, बाकीचा वेळ थपकीच्या दमदार पात्रात घालवायची.


कुटुंबाला वेळ देता आला नाही, तब्येत बिघडली
जिग्यासा सिंहच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या कुटुंबासोबत वेळही घालवू शकत नव्हती. त्यानंतर तिचे वजन वाढू लागलं आणि तब्येत आणखी खालावली. दरम्यान तिला थायरॉईड झाला. त्यानंतर जिग्यासा सिंहने तिच्या तब्येतीला प्रथम प्राधान्य दिलं आणि तिने 'थपकी प्यार की 2' शो सोडला.


20 दिवसात वजन 7 किलोने वाढलं, केस गळायला लागले.
अभिनेत्रीने सांगितले की, अवघ्या 20 दिवसांत तिचं वजन 7 किलोने वाढलं होतं, ज्यामुळे ती घाबरली होती. तिला अलोपेसिया झाला आणि तिचे केस अचानक गळू लागले. तपासणी केली असता तिला थायरॉईड असल्याचं आढळून आलं. जिज्ञासा पुढे म्हणाली की, तिने शोमध्ये तिला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती मुळीच अनप्रोफेशनल नव्हती ना ही तिने कधी तिचे पैसे वाढवले, जसं सांगितलं जातं. जिग्यासा सिंग आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि अभिनय क्षेत्रात परतण्यासाठी ती सज्ज झाली आहे.