Parineeti Chopra About Fitnes: बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या अमर सिंग चमकीलांच्या आयुष्यावर आधारीत चमकीला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने मनोरंजनसृष्टीमध्ये स्थिरावताना सामना कराव्या लागलेल्या आव्हानांबद्दल भाष्य केलं आहे. सुरुवातीला आपल्याला फारसे पैसे मिळत नव्हते, असं परिणितीने म्हटलं आहे. बिझनेस क्लासमधून उड्डाण करण हे त्यावेळी माझ्या बजेटच्या बाहेरची गोष्ट होती, असंही परिणितीने सांगितलं. या साऱ्या गोष्टी आता कुठे आपल्याला परवडतात अशा अर्थाचं विधानही तिने केलं. मुंबईमधील एका सहकलाकाराने आपली खिल्ली उडवल्याची आठवणही तिने या मुलाखतीत सांगितली. महिना 4 लाख रुपये फी देऊन तुला साधा जीम ट्रेनर ठेवता येत नाही, असं म्हणत माझी खिल्ली उडवण्यात आलेली, असं परिणिती म्हणाली.


अनेकांचे पूर्वग्रह दुषित होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज शमिनीच्या पॉडकास्टमध्ये परिणिती सहभागी झाली होती. "माझी कौटुंबिक पार्श्वभूमी फार सधन होती असं नाही. मी फार साधी आणि मध्यम वर्गीय मुलगी आहे. मला खरंच बॉलिवूड कळत नाही. मुंबईतील लोकं कशी काम करतात याची मला कल्पना नव्हती. माझे मित्र-मैत्रिणी महागडी विमान तिकिटं विकत घेऊन प्रवास करमार नव्हते. माझ्याकडे जीम ट्रेनर, स्टायलिस्ट कोणी नव्हतं. माझ्यासाठी सारं काही तयार आहे असंही काही नव्हतं. अशा वेळी जे लोक मुळचे मुंबईत या क्षेत्रात काम करायचे आणि त्यांना या साऱ्या गोष्टी माहिती होत्या, त्यांनी मला या आधारावर फार पूर्वग्रह दुषित मतं तयार केली," असं परिणिती म्हणाली.


मला सल्ला दिला की 4 लाख दर महिना खर्च कर


मनोरंजनसृष्टीमध्ये सुरुवातीची काही वर्ष मला फारसा पैसा मिळत नव्हता, असंही परिणिती म्हणाली. परिणितीने यावेळेस एक आठवण सांगताना कोणीतरी मला वजन कमी करण्यासाठी 2 लाख रुपये प्रति महिना फी देऊन ट्रेनर नियुक्त करण्याचा सल्ला दिला होता. तसेच इतकीच फी घेणारा न्युट्रीशिअनही अपॉइण्ट करण्याचा सल्ला मला देण्यात आला होता, असं परिणिती म्हणाली.



...तर इथे यायला नको होतं


"त्यावेळेस मी म्हटलं की, माझ्याकडे प्रत्येक महिन्याला देण्यासाठी 4 लाख रुपये नव्हते. मी त्यावेळेस एवढा पैसा कमवत नव्हते. तेव्हा मी केवळ माझा तिसरा चित्रपट करत होते. त्यावेळेस माझा सह-कलाकार असा होता ज्याचा जन्मच मुंबईत झाला होता. ते याच जगात लहानाचे मोठे झाले होते आणि त्यांच्याकडे या साऱ्या गोष्टी सुरुवातीपासूनच होत्या. तो मला म्हणाला, तू या साऱ्या लोकांना का अपॉइण्ट करत नाहीत? तेव्हा मी त्याला म्हणाले होते, 'हे बघ हे सारं मला परवडणार नाही.' मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी 5 लाखांचं मानधन देण्यात आलं होतं. माझं म्हणणं ऐकून तो मला म्हणाला की, तुला हे परवडणार नसेल तर तू या क्षेत्रात यायला नको होतं," अशी आठवण परिणितीने सांगितली.