वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांच्या मराठी बिग बॉस (Bigg Boss) यांच्या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरुय. पुढच्या आठवड्यापासून प्रेक्षकांना बिग बॉस (Bigg Boss) कार्यक्रम पाहता येणार आहे. या कार्यक्रमामध्ये कोणते चेहरे दिसणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.  मात्र आता या लोकप्रिय कार्यक्रमात काही राजकारणी दिसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत भाष्य केलंय. बिग बॉसमध्ये बोलावलं नक्की जावू..अशी संधी कुणाला मिळते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगावात एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 


"गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे म्हणत असत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो. बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे. मिळाली तर निश्चितपणाने जावू," असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे.