मुंबई : या फोटोत दिसणार्‍या या मुलाने बॉलिवूडमधील जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भारतीय चित्रपट इंडस्ट्रीच्या इतिहासात असे काही चित्रपट होते ज्यात त्यांची व्यक्तिरेखा सुवर्णाक्षरांनी छापली गेली. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या पहिल्या चित्रपटात त्यांची भूमिका फक्त दोन मिनिटांची होती, पण या अभिनेत्याने अशी छाप सोडली की, त्यांच्याकडे एकामागून एक चित्रपटांची रांग लागली. शोले चित्रपटात आपले दोन्ही हात गमावलेल्या ठाकूरची भूमिका साकारून त्यांनी चित्रपट इतिहासाच्या पानात आपलं नाव कोरल. होय, हा फोटो आहे संजीव कुमार यांच्या बालपणीचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजीव कपूर यांनी 'हम हिंदूस्तानी' या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांचा रोल फक्त दोन मिनिटांचा होता. मात्र या सिनेमानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत आणि हा अभिनेता एकेदिवशी खूप मोठा स्टार बनला. वयाच्या ४७व्या वर्षी  1985 मध्ये या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला. 


हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचं नातं
संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांनी 'सीता और गीता' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांवर चित्रपटातील 'हवा के साथ साथ' हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं, जे सुपरहिट ठरलं होतं. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघांसोबत एक अपघात झाला, त्यादरम्यान त्यांना स्वतःपेक्षा एकमेकांची जास्त काळजी वाटू लागली आणि यानंतर दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागलं.


संजीव यांना हेमा यांच्याशी लग्न करायचं होतं. लेखक हनिफ झवेरी आणि सुमंत बत्रा यांनीही त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. हेमा जेव्हा जेव्हा संजीव यांच्या आईला भेटायला यायच्या तेव्हा ती डोक्यावरुन पदर घेवून चेहरा झाकायच्या. मात्र, त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते एकत्र येऊ शकले नाहीत.


संजीव कुमार कायम एकटेच राहिले
खरंतर संजीव कुमार यांना अशी पत्नी हवी होती जी, घरी राहून आईची सेवा करेल, पण हेमा यांनी त्यावेळी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं. अशा परिस्थितीत दोघांमध्ये अंतर येऊ लागलं. हेमापासून विभक्त झाल्यानंतर संजीव कुमार यांनी कधीही लग्न केलं नाही आणि ते कायम एकटे राहिले. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रशी लग्न केलं आणि चित्रपटांमध्ये काम करणं सुरूच ठेवलं.