नवी दिल्ली : मंगळवारी गोव्यात ४८ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचा समारोप झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सोहळ्यात सगळ्यांनीच अमिताभ यांना सन्मान दिला. मात्र अक्षय कुमारने अमिताभ यांच्यासोबत असं काही केलं की बिग बी तिथे अगदी लाजले. 


घाबरू नका, अक्षयने असं काही केलं नाही की त्याच्या चाहत्यांना विचित्र वाटेल. अक्षयने अमिताभ यांना फिल्म इंडस्ट्रीचे वडिल असं संबोधून त्यांच्या पाया पडला. आणि अमिताभ आणि अक्षय यांच्यातील हा संवाद सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला. आणि बिग बी यांनी देखील हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. 



काय घडला नेमका हा प्रकार? 



बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते अमिताभ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी अमिताभ यांना मंचावर निमंत्रित केले गेले आणि अक्षय कुमार लगेच अमिताभ यांना घ्यायला पोहोचला. अमिताभ यांना बघताच, अक्षय त्यांच्या पाया पडण्याासाठी खाली झुकला. पण त्यापूर्वीच अमिताभ यांनी अक्षयला वर उचलत त्याला जवळ घेतले. 



अमिताभ आणि अक्षयचा  इफ्फीतील हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. अक्षय कुमारने बिग बींचे चरणस्पर्श केल्याचे पाहून twitter युजर्सनी याची प्रशंसा केली. पण यामुळे अमिताभ कमालीचे अवघडले. एका युजरने शेअर केलेला या प्रसंगाचा फोटो रि-tweet करत , ‘अक्षयच्या कृतीने मी संकोचलो. अक्षय, असे करायला नको होते’, असे बिग बींनी लिहिले. यानंतर बिग बींनी इफ्फी समारोहातील अन्य काही फोटो शेअर करत, अक्षय कुमार, करण जोहर आदींचे आभार मानलेत.