पणजी : गोव्यातील इफ्फी मोहोत्सवात 'क्षितिज' या मराठी सिनेमाला गौरविण्यात आले. मात्र, या सिनेमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्या सारख्या प्रश्नावार वाचा फोडण्यात आली. या प्रश्नाची चित्रपट महोत्सवात दखल घेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात पार पडलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी २०१७ मध्ये मराठीचा झेंडा फडकला आहे.'क्षितिज' या मराठी सिनेमाला यंदाचा युनेस्को तर्फे देण्यात य़ेणारा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला.  


अभिनेता उपेंद्र लिमयेची प्रमुख भूमिका असणाऱ्या  'क्षितिज' या सिनेमातून शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर प्रश्न मांडण्यात आला आहे. या सिनेमाला मिळालेला हा पुरस्कार नक्कीच मराठी सिनेइंडस्ट्रीला ऊर्जा देणारा आहे.


तब्बल आठवडाभर चाललेल्या या महोत्सवात जगभरातील विविध भाषांतील सिनेमांची मेजवानी रसिकांना पाहायला मिळाली. तब्बल नऊ मराठी सिनेमांची इफ्फीसाठी निवड झाली होती. त्यातून 'क्षितिज'ने बाजी मारली.