मुंबई : भारतीय कलाविश्वातील काही मानाच्या पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यालाही corona कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. जगभरात कोरोनाचा कहर आणि देशातही या व्हायरसविषयी भीतीचं वातावरण पाहता आयफा पुरस्कारांच्या आयोजकांनी या सोहळ्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्याच्या अखेरीस यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा मध्य प्रदेशमध्ये होणार होता.  IIFA 2020च्या निमित्ताने जगभरातून कलाविश्वातील काही प्रसिद्ध मंडळीं या सोहळ्यासाठी येणं अपेक्षित होतं. पण, आता मात्र बॉलिवूडचा ऑस्कर समजल्या जाणाऱ्या या सोहळ्यावरही कोरोनाचं सावट आलं आहे. 


शुक्रवारी आयफाच्या आयोजकांकडून याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली. 'जगभरात पसरणारा कोरोना व्हायरस आणि आयफाचे चाहते, सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याचे काही निकष लक्षात घेता मध्य प्रदेश राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतर आयफाच्या कार्यकारिणीकडून आणि चित्रपट विश्वातील काहीजणांशी विचारविनिमय करुन या पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'




पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल


 


नागरिक आणि चाहत्यांच्या आरोग्याला आम्ही प्रथम प्राधान्य दिल्यातं सांहत पुरस्कार सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आयोजकांनी सद्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची बाब अधोरेखित केली.