ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांच्या लेकीचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन
Ilayaraja Daughter Death: लोकप्रिय जेष्ठ संगीतकार इलैयाराजा यांची लेक आणि प्लेबॅक सिंगर भवतारिनी यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन.
Ilayaraja Daughter Death: लोकप्रिय जेष्ठ संगीतकार इलैयाराजा यांची लेक आणि प्लेबॅक सिंगर भवतारिनी या कॅन्सरचा लढा हरल्या आहेत. भवतारिनी यांनी 25 जानेवारी रोजी श्रीलंकेच अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, त्यांना लिव्हरचा कॅन्सर होता. त्या 6 महिन्यांपासून त्यासाठी उपचार घेत होते. उपचार करण्यासाठी भवतारिनी या श्रीलंकेला गेल्या होत्या. उपचारा दरम्यान, जवळपास संध्याकाळी 5 वाजता श्रीलंकेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री ट्रॅकर रमेश बाला यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत याविषयी माहिती दिली. त्यांनी भवतारिनीला श्रद्धांजली देत लिहिलं की दुखद बातमी! इसाइग्नानी इलियाराजा यांची लेक गायक भवतारिणी यांचे आड निधन झाले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. हे ऐकल्यानंतर आश्चर्य झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
रिपोर्ट्सनुसार, भवतारिणी यांच्या पार्थिवाला 26 जानेवारी रोजी चेन्नईत आणण्यात येईल आणि तिथेच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. 47 वर्षांच्या भवचारिणी या इलैयाराज यांची लेक आणि कार्तिकी राजा आणि युवान शंकर राजा यांची बहिणी होत्या. त्यांना 'भारती' चं तमिळ गीत 'मयिल पोला पोन्नू ओन्नू' साठी बेस्ट फीमेल प्लॅबॅक सिंगर नॅशनल फिल्म पुरस्कार मिळाला होता.
त्यांनी संगीतकार देवा आणि सिरपी यांच्यासाठी देखील गाणी गायली आहेत. 2002 मध्ये त्यांनी रेवती दिग्दर्शित 'मित्र, माई फ्रेंड' साठी म्यूजिक कंपोज केले होते. त्यानंतर त्यांनी 'फिर मिलेंगे' आणि काही चित्रपटांसाठी म्यूजिक दिलं. त्यांचं शेवटचं म्यूजिक अल्बम हा मल्याळम चित्रपट 'मायनाधि' साठी होता. त्यांनी कधालुक्कु मरियाधई, अजगी, फ्रेंड्स, पा, मनकथा आणि अनेगन सारख्या तमिळ चित्रपटांसाठी गाणी तयार केली होती.
इलैयाराजा यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते एक भारतीय गायक, अरेंजर, ऑर्केस्ट्रेटर आणि मल्टी-मल्टी-इंस्ट्रूमेंटलिस्ट गाायक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधील प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जातात. इलैयाराजा यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी 'ऐ जिंदगी गले लगा ले', 'तेरी निगाहों ने', 'ये हवा ये फिजा' आणि 'हिचकी-हिचकी' सारखे अनेक गाणी गायली आहेत.