मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इलियानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलियाना डिप्रेशनमध्ये होती. त्या कारणानेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जागतिक आरोग्य संमेलनच्या चौथ्या दिवशी इलियाने हे स्वत: सांगितले. 


आपला अनुभव सांगताना इलियाना म्हणाला की, ‘मी नेहमीच एक सेल्फ कॉन्शिअस व्यक्ती राहिली आहे. मी प्रत्येकवेळी स्वत:ला दु:खी आणि कमजोर समजत होती. मी शारिरीक डिसमॉर्फिक या आजाराने पीडित असल्यावर मला हे समजून घेण्यात मदत झाली. एकावेळी मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता आणि मला सगळं संपवायचं होतं. पण नंतर सगळं बदललं आणि मी स्वत:चा स्विकार केला’.


इलियाना म्हणाली की, ‘डिप्रेशन खूपच वास्तविक आहे. हे तुमच्या डोक्यात एक रासायनिक असंतुलन असतं आणि यातून सुटका मिळवण्यासाठी उपचाराची गरज असते’.


६ कोटी भारतीय डिप्रेशनचे शिकार


भारतात ६ कोटी लोक मनोरूग्ण आणि डिप्रेशनने ग्रस्त आहेत. विश्व मानसिक स्वास्थ्य संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील मित्तल म्हणाले की, पहिली हे जाणून घेण्याची कसोटी आहे की, ‘तुम्ही निराश आहात’. चिंता असणे ही सामन्य बाब आहे. देशातील ६ कोटी लोक डिप्रेशनने ग्रस्त आहेत. लोक गप्प बसून सगळं सहन करत असतात. त्यांना याची कल्पनाही नसते की, ते डिप्रेशनने ग्रस्त आहेत’.