Illeana D'cruz Photo with Mystery Man: अभिनेत्री इलियाना डिक्रुजनं काही महिन्यांपुर्वी आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला होता. लग्नाची काहीच खबरबात नसताना इलियानानं अचानकच आपण गरोदर असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसह इन्टाग्रामवरून शेअर केली होती. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं होतं. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या बेबी बंपचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. आपल्या प्रेगंन्सीची घोषणा केल्यानंतर तिला अनेकांनी होणाऱ्या बाळाचा पिता कोण? असे थेट प्रश्न विचारले होते. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. आता या चर्चांनी मात्र एक वेगळंच वळण घेतलं आहे. आता तिनं एक मिस्ट्रीमॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. इलियानाच्या होणाऱ्या बाळाचे हेच वडील आहेत का यावर नेटकऱ्यांनी सपाटून प्रश्नांचा मार केला आहे. यावेळी तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं आपला हातातील आणि आपल्यासोबत असणाऱ्या मिस्ट्रीमॅनच्या हातातील अंगठी दाखवत एक ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे त्यामुळे चर्चांना जोरात उधाण आलं आहे. तिनं या फोटोखाली एक कॅफ्शनही टाकलं आहे. हा फोटो एका रेस्टोरंटमधला दिसतो आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, ''माझी रॉमान्सची कल्पना हीच आहे. खरंच, मी त्याला शांततेत बसून देणार नाही.'' सध्या तिच्या या फोटोमुळे चर्चांना जोरात उधाण आलं आहे. 


हेही वाचा - 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींना दहावीला किती मार्क्स होते?


त्यामुळे इलियानानं लग्न केलं आहे का इथपासून ते तिनं आता प्रेग्नंन्सीनंतर लग्न केलं आहे का इथपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी तिच्यासोबत असणारी व्यक्ती आहे तरी कोण यावरही अनेक चर्चां सुरू झाल्या आहेत. त्यातून हाच तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता आहे, असे प्रश्नही अनेक जणं विचारताना दिसत आहेत. इलियाना सध्या हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिनं आपल्या प्रेग्नंन्सीची बातमीही इन्टाग्रामवरून दिली होती. तिनं बेबी बंपचा फोटोही शेअर केला होता. ज्यात ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत होती. 



इलियानाचं काही दिवसांपुर्वी एक सॉन्गही रिलिज झाले होते. बॉलिवूड 'बर्फी' या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटांमधून डेब्यू केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा यांच्याही प्रमुख भुमिका होत्या. आता ती आपल्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांमुळे सध्या स्पॉटलाईटमध्ये आली आहे.