मुंबई : बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नेंट झाल्या आहेत. त्यात आता आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार आणखी एक अभिनेत्री प्रग्नेंट असल्याचं म्हटलं आहे आणि तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये आपले सिक्रेट लपवणाऱ्यांमध्ये इलियाना डिक्रूजचा नंबर लागतो. मीडियापासून लांब राहणारी इलियाना सध्या प्रग्नेंट असल्याच्या चर्चा आहेत. इलियांना हिने आपला बॉयफ्रेंड देखील जगापासून अनेक दिवस लपवून ठेवला होता. अँड्रयू नीबोनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती प्रेग्नेंट असल्य़ाचं दिसत आहे.



आपली स्टाईल स्टेटमेंट्स आणि फॅशनेबल आउटफिट्ससाठी प्रसिद्ध इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका बाथ टबमध्ये दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने याबाबत संकेत दिले आहेत.