मुंबई : कंगना राणावत ही तिच्या आगामी ‘सिमरन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, ती अभिनयासोबत इंडस्ट्रीतील आणखीही काही गोष्ट शिकत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयासोबतच तिला दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीही करायची आहे. कंगना म्हणाली की, ‘मला वाटतं की, क्रिएटीव्ह असल्याच्या कारणाने मी अभिनयासोबतच आणखी खूपकाही करू शकते. मी वेगळ्या प्रकारचे सिनेमे करू शकते. मला सिनेमे लिहायचे आहेत, त्यांचं दिग्दर्शन करायचं आहे. हे करून मला यात यश मिळालं नाही, तरी मला निदान माझ्या सीमा माहिती होतील’.


जेव्हा कंगनाच्या या स्टेटमेंटबाबत एका मुलाखतीत प्रियंका चोप्राला विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली, ‘मला नाही वाटत की निर्माती असल्याने मी हे करत आहे. मी जे काही आता करत आहे, ते भारताती सर्वात जास्त अनुभवी फिल्ममेकर्ससोबत काम केल्यानंतर करत आहे. मला माहिती आहे की, ज्या लोकांसोबत मी काम करत आहे, ते या फिल्डमधील एक्सपर्ट आहेत. ते ऎकमेकांच्या मदतीने चांगलं काम करू शकत आहेत. मला असं नाही वाटत की, सगळंच मी करायला हवं, सगळीकडे माझंच नाव असायला पाहिजे’.


प्रियंका म्हणाली, ‘सिनेमा करणं काही रॉकेट सायन्स नाहीये. यात काही लोक एकत्र येऊन एक कथा तयार करतात आणि ती सिनेमात रूपांतरीत करतात. जर मला काही वाटलं तर मी निर्माते-दिग्दर्शक यांच्या बोलते, पण मी माझं म्हणणं त्यांच्यावर थोपवू शकत नाही’.


इंडस्ट्रीमध्ये काही दिग्दर्शक घमेंडी असतात, या कंगनाच्या वक्तव्याचं प्रियंकाने समर्थन केलंय. ती म्हणाली, ‘केवळ दिग्दर्शकच नाही तर मनोरंजन विश्वातील प्रत्येक माणूस घमेंडी आहे. माझ्यात नाहीये आणि मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय ते फारच सहयोगी होती. त्यांनी नेहमीच मला सन्मान दिला आणि मी कधीही त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही’.