मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक अभ्यासा व्यतिरिक्त कलेलासुद्धा अधिक प्रधान्य दिलं जातं. नृत्य, संगीत, क्रिडा अशा अनेक प्रकारच्या कला आज विद्यार्थांसाठी उपलब्ध आहेत. एकढेच नाही पालक देखील आपल्या पाल्याला काय नवीन देता येइल याकडे विशेष लक्ष देतात. त्यात नृत्याला विशेष महत्व दिले जाते. भारत देशात अनेक प्रकारचे नृत्य प्रकार उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नृत्य विद्यालयांचा देखील प्रसार होत आहे. महत्वाचं म्हणजे मुलांना देखील नृत्याबद्दल विशेष प्रेम असल्याचे पाहायला मिळत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध नर्तक आणि कोरिओग्राफर मेल्विन लुईस सतत त्याच्या नृत्य कलेचे प्रदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या नृत्याचे चाहते देखील अनेक आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान त्याने नृत्याचे महत्व जमलेल्यांना पटवून दिले आहे. 


आताच्या काळातील नृत्याचे महत्व पटवून देत तो म्हणाला की, 'नृत्य आता व्यवसायीक पातळीवर फार सोपं झालं आहे. फक्त आपण ध्येया प्रती एकनिष्ट असायला हवं. त्यामुळे नृत्यामध्ये सुद्धा आपण करियर करू शकतो.'


अनेक बॉलिवूड कलाकार देखील मेल्विन लुईसच्या तालावर थिरकले आहेत. त्याचप्रमाणे तो आपल्या फॉशन सेन्सने सुद्धा ओळखला जातो.