मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मोठ्या कालावधी नंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही जणू आनंदाची पर्वणीच म्हणता येइल. 'द स्काय इंज पिंक' चित्रपटाच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करणार. सध्या चित्रपटाचं दमदार प्रमोशन सुरू आहे. एकीकडे प्रियांकाचं चित्रपट सृष्टीत आगमन तर दुसरीकडे 'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीम कलाविश्वाला रामराम ठोकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या निर्णयावर अनेक बॉलिवूडकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. त्याचप्रमाणे झायराच्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी देखील तिला चांगलेच ट्रोल केले. नुकताच 'मुंबई मिरर'ने घेतलेल्या मुलाखतीत अभिनेता फरहान अख्तरला झायराने घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.


मुलाखतीत झायराला सल्ला देताना फरहान म्हणाला की 'आपल्याला कोणाच्या खाजगी आयुष्यात बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही. प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण जर कोणी चांगल काम करत आसेल तर आपण बोलायला काही हरकत नाही. माझ्या मते झायरा तिचं निर्णय बदलेल अशी माझी इच्छा आहे.'


धर्माचं कारण देत तिने चित्रपट विश्वाला रामराम ठोकला होता. त्यामुळे तिचं चित्रपटसृष्टी सोडणं एक वादाचा मुद्द बनला होता. झायरा वसीम 'द स्काय इज पिंक' चित्रपटात प्रियांका-फरहानच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.