मुंबई : 'आई कुठे काय करते' या मालिकेला सर्वांत जास्त प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. गृहिणी आईच्या संसाराभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 
या मालिकेत एकामागोमाग एक अशा विविध घडामोडी घडताना दिसत आहेत.अनेकदा या मालिकेतील काही नव्या पात्रांची देखील एन्ट्री झाली आहे. आणि त्यामुळे अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहता आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातच आता आणखी एका व्यक्तिने देशमुखांच्या घरात एन्ट्री केली आहे. एकीकडे आता संजना आणि अनिरुद्धचं लग्न झालं आहे. सगळ्या वादविवादानंतर दोघे पुन्हा एकत्र येत आहेत.त्यात आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला आहे.


संजना आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र येत असतानाच दारावर एका व्यक्तिचा आवाज येतो. ही व्यक्ति म्हणजे संजनाचा मुलगा..



होय संजनाच्या मुलीचा या मालिकेत आता एन्ट्री आहे.  निखील असं त्याचं नाव आहे. शेखर आणि संजनाचा मुलगा निखील आता आईसोबत राहण्यासाठी देशमुखांच्या घरी आला आहे. तेव्हा या सगळ्यात निखीलमुळे अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल का हे येत्या भागात कळेलच...