मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा हिने नुकतीच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमाच्या प्रीमियरला आपल्या कुटुंबासह हजेरी लावली.  फोटोग्राफर्संनी न्यासाला अजय देवगण, काजोल आणि भाऊ युग यांच्यासोबत मुंबईतील प्रीमियर स्थळाच्या गाठले. यावेळी न्यासा देवगण खूप मस्तीच्या मूडमध्ये  दिसत होती. मग नाचतच ती आत निघून गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यासाने मॅचिंग मास्कसह ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती अगदी खुलून दिसत होती.



फोटोग्राफर्सनी न्यासाला इमारतीच्या बाहेर चालताना आणि आनंदाने नाचताना पाहिले. पापाराझीला पाहून तिने सगळ्यांना हस्तांदोलन केले आणि कुटुंबासोबत ती निघून गेली.



न्यासा देवगण बऱ्याचदा कॅमेरा टाळताना दिसते, पण यावेळी तिने तसे काही न करता पापाराझींना पाहून हात दाखवला आणि नाचत बागडत ती आत निघून गेली.