`दादासाहेब फाळके पुरस्कार 2024`मध्ये या कलाकारांनी मारली बाजी; पाहा विजेत्यांची यादी
दादासाहेब फाळके पुरस्कार 2024` सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला कलारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील स्टार्स त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत जेव्हा त्यांना वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ या पुरस्काराच्या रूपात मिळेल. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड सोहळ्यात दिग्दर्शक ऍटली पत्नी प्रियासोबत पोहोचले होते. याशिवाय बॉबी देओल, शाहिद कपूर, करीना कपूर, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते. यावर्षी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर नयनताराला 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा.
पाहा 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2024' विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- नयनतारा, (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, (मिसेज चटर्जी वर्सेज नोर्वे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संदीप रेड्डी वंगा, (एनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विकी कौशल, (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- अनिरुद्ध रविचंदर, (जवान)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल) - वरुण जैन, (तेरे वास्ते, जरा हटके जरा बचके)
बेस्ट एक्टर इन नेगेटिव रोल - बॉबी देओल, (एनिमल)
टीव्ही मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- रुपाली गांगुली, (अनुपमा)
टीव्ही मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- नील भट्ट, (घूम है किसी के प्यार में)
टीवी सीरीज ऑफ द ईअर- (घुम है किसी के प्यार में)
वेब सिरीज मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- करिश्मा तन्ना, (स्कूप)
आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू द फिल्म इंडस्ट्री - (मौसमी चटर्जी)
आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू द म्यूझिक इंडस्ट्री - (केजे येसुदास)
जर तुम्हाला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 पाहायचा असेल तर OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर तुम्ही पाहू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 'दादासाहेब फाळके 2024'च्या रेड कार्पेटवर बी टाऊन सेलेब्सने खूप लाइमलाईट लूटली. या इव्हेंटमध्ये शाहिद कपूर, करिना कपूर, राणी मुखर्जी, शाहरुख खान, नयनतारा, बॉबी देओल, अदा शर्मासोबत अनेक सेलिब्रिटीनी या कार्यक्रमात हजेरी लावली. आता या कार्यक्रमाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत. यासोबतच युजर्सही सेलेब्सचं कौतुक करताना थकत नाहीयेत.