Kusha Kapila on Arjun Kapoor : सोशल मीडिया स्टार कुशा कपिला तिच्या कॉमेडी व्हिडीओमुळे सतत चर्चेत असते. 2020 मध्ये कुशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट हा 'घोस्ट स्टोरीज' होता. त्यानंतर कुशानं अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. चित्रपट आणि सीरिज यांच्यासोबत कुशा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. गेल्या वर्षी कुशानं जोरावर अहलूवालियाला घटस्फोट दिल्याचे सांगितले. त्यानंतर तिचं नाव सतत अर्जुन कपूरशी जोडण्यात आलं. डेटिंगच्या चर्चांमध्ये कुशानं अर्जुन कपूरसाठी एक हॅशटॅग दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कुशा कपिला ही तिची आगामी वेब सीरिज लाइफ हिल गईच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. ती सीरिजचं प्रमोशन करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुशा कपिलाला अर्जुन कपूरविषयी विचारण्यात आलं. त्यानंतर कुशानं त्याला एक हॅशटॅग दिलं. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखीत कुशा कपिलाला अर्जुनला एक हॅशटॅग देण्यासाठी सांगितलं. तेव्हा तिनं थोडा विचार केला आणि सांगितलं की अर्जुन कपूरला #Kapoor हे टॅग देईन.



अर्जुन कपूर आणि कुशा कपिलाच्या डेटिंगच्या अफवांच कारण करण जोहरच्या घरी झालेली पार्टी आहे. करणच्या पार्टीत अर्जुन आणि कुशा एकत्र दिसले. त्यानंतर अशी चर्चा रंगली की ते एकमेकांना डेट करत आहेत. कुशा आणि अर्जुननं मात्र, त्यांच्या डेटिंगच्या अफवा असल्याचं सांगितलं. पण अर्जुननं यावर अजुनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. असं म्हटलं जातं की मलायका आणि अर्जुन दोघं वेगळे झाले आहेत. पण अजून मलायका किंवा अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा ही खरंच आणि की अफवा हे अजून ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं नाही. 


कुशाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं 2017 मध्ये जोरावरशी लग्न केलं. दोघं नेहमीत एकत्र सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलं आहे. पण जेव्हा कुशा आणि जोरावरच्या घटस्फोटाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.