दुर्गा पूजेवेळी काजोलच्या मुलाने धरला एकच हट्ट, अखेर अभिनेत्रीने...
नुकतच शुभ अष्टमीच्या निमित्ताने काजोल पुन्हा एकदा मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या `उत्तर मुंबई दुर्गा पूजा समिती`च्या पंडालमध्ये पोहोचली.
मुंबई : नुकतच शुभ अष्टमीच्या निमित्ताने काजोल पुन्हा एकदा मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या 'उत्तर मुंबई दुर्गा पूजा समिती'च्या पंडालमध्ये पोहोचली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी माँ दुर्गाचे दर्शन घेतले. विशेष गोष्ट अशी की यावेळी काजोलसोबत तिचा मुलगा युग सुद्धा दर्शनासाठी पोहोचला होता, तर काजोलची आई तनुजा आणि बहीण तनिषा मुखर्जी देखील शुभ अष्टमीच्या विशेष प्रसंगी आई दुर्गाला भेटायला आल्या होत्या.आशिर्वाद घेण्यासाठी आले होते. या दरम्यान संपूर्ण मुखर्जी कुटुंब पारंपारिक लुकमध्ये दिसले.
यावेळी तनिषा मुखर्जी म्हणाली, कोरोना काळात दुर्गा उत्सव साजरा करण्याविषयी आणि त्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल बोलले. त्यांनी दरवर्षी दुर्गा उत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते आणि संपूर्ण कुटुंबासह उत्सव साजरा करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.
मौनी रॉयही पंडालला भेट देण्यासाठी आली होती
याआधी, अभिनेत्री मौनी रॉय देखील पारंपारिक बंगाली लूक करुन माँ दुर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती, पण ती जास्त वेळ पंडालवर थांबली नाही आणि माँ दुर्गाचा आशीर्वाद घेऊन लवकरच निघून गेली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर देखील पूजेत दिसले. दोघांनी मिळून माँ दुर्गाचे आशीर्वाद घेतले.
मुलाने केला हट्ट
यावेळी काजोलचा मुलगा युग देखील माँ दुर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला होता. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो आई जवळ हट्ट करताना दिसत आहे. या दोघांमधील संवाद मात्र कळू शकलेला नाही. पण काजोल त्याला समजावताना दिसली.