मुंबई : हॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार यांची जगभरात ख्याती आहे. संपुर्ण जगात त्यांचे चाहते आहेत. सोशल मीडियावर ही त्यांचं मोठं फॅन फॉलोविंग असतं. त्यात अनेक स्टार्सचे फॅन्स आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्यासाठी खूप आतुर असतात. आणि ही संधी जेव्हा त्यांना भेटते तेव्हा त्यांना कसलंच भान राहत नाही. काही फॅन्स असतात जे आपल्या आवडत्या अभिनेत्याला देव मानतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या फॅन्सबद्दल काही वेगळं सांगायला नको, त्यांचे फॅन्स रजनीकांत यांचा सिनेमा रिलीज होताच जल्लोष करतात. आणि थिएटरबाहेर एकच नारा असतो. आणि रजनीकांत यांचा जय-जय कार असतो. साऊथचे असे आणखीन काही स्टार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने मोठं फॅन फॉलोविंग निर्माण केलं आहे.


त्यात साऊथ स्टार राम चरण याचा ही समावेश आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. ज्यात त्याचा एक जबरा फॅन दिसून येत आहे. पण या फॅनने जे केलं ते पाहून सगळेच आर्श्चयचकीत झाले , तर काहींना भीतीच वाटली.
या व्हायरल व्हिडिओत भर स्टेजवर राम चरणच्या दिशेने हा फॅन वेगाने धावत आला. आणि जोरात उडी मारत त्याने राम चरणचे पाय धरले. त्याने घट्ट पाय धरुन ठेवले आणि तो अभिनेत्याला सोडायला तयार नव्हता. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला, पण यावेळी अभिनेत्याने आणि काही बॉडीगार्डसने चाहत्याला उचललं आणि बाजूला नेलं. Natyam सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही टीम एकत्र जमली होती. त्यावेळी ही घटना घडली. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पण यावेळी घडलेल्या भर स्टेजवरील या प्रकारामुळे अभिनेता राम चरणला चाहते जणू त्यांचा देव मानतं असल्याचं दिसत आहे.