Puneeth Rajkumar च्या मृतदेहाला मुख्यमंत्र्यांनी जवळ घेतलं आणि...
पुनीत राजकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी बेंगळुरू येथील कांतीराव स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. वाढत्या गर्दीमुळे अभिनेत्याचे पार्थिव आधीच स्टुडिओत नेण्यात आले. अशा परिस्थितीत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पहाटे पोहोचले होते. यादरम्यानचे काही भावनिक क्षणांचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुनीत राजकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर चाहत्यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान अनेक भावनिक क्षणही पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सीएम बसवराज बोम्मई आपल्या आवडत्या अभिनेत्याला कपाळावर किस करून अखेरचा निरोप देताना दिसत आहेत.
हा क्षण पाहून सर्वांचे डोळे पाणावले. तिथे उपस्थित सर्व सेलिब्रिटींनी ओलसर डोळ्यांनी अभिनेत्याला निरोप दिला.