मिलिंद सोमणसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री...
जाणून घ्या या गोष्टी
मुंबई : देशातील पहिली सुपरमॉडेल मधु सप्रे हिचा जन्म आज म्हणजे 14 जुलै 1971 रोजी नागपुरमध्ये झाला. मधु सप्रे मॉडेलिंगच्या दुनियेत आपल्या बोल्ड अंदाजामुळे भरपूर चर्चेत आली. मात्र तुम्हाला वाचून धक्का बसेल पण मधु एक मॉडेलच नाही तर एथलीट देखील आहे. 90 च्या दशकात फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांची नजर 19 वर्षाच्या मधु सप्रेवर पडली. त्यांनी मधूच फोटोशूट केलं आणि तेव्हाच एथलीट होण्याच स्वप्न बाळगणारी मधू सप्रे मॉडेल क्षेत्रात लोकप्रिय झाली. गौतम यांनी मधु सप्रेला मिस इंडियाचा फॉर्म भरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने फॉर्म भरला आणि आश्चर्य म्हणजे ती शॉर्ट लिस्ट झाली.
1992 मध्ये मधु सप्रेम मिस इंडियात निवडली गेली आणि ती पहिली कंटेस्टेंट होती जी मिस युनिवर्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाली होती. मधूने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. फायनल राऊंडमध्ये मधूला प्रश्न विचारण्यात आला की, जर तू देशाची पंतप्रधान झालीस तर तू सर्वात अगोदर काय करशील. त्यावर ती म्हणाली की, मी जगातील सर्वात मोठं स्पोर्ट्स स्टेडिअम बनवेन. परिक्षकांना हे उत्तर खूप कमजोर वाटलं. आणि यामुळेच तिचा तिसरा क्रमांक आला.
मिस इंडियानंतर मधु सप्रेच मिलिंद सोमणसोबत अफेअर होत. 5 वर्ष हे दोघे एकमेकांसोबत लिव - इनमध्ये राहिले. 1995 मध्ये मधु आणि मिलिंद एका प्रिंट जाहिराती करता न्यूड फोटोशूट केलं. या फोटोमुळे त्यावेळी खूप खळबळ माजली होती. या फोटोमुळे खूप वाद - विवाद झाले. एवढंच काय तर मुंबई पोलिसांनी ऑगस्ट 1995 मध्ये मधु आणि मिलिंद सोमण विरोधात तक्रार दाखल केली. 2003 नंतर मधु अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफसोबत 'बूम' सिनेमात दिसली. आता मधु या ग्लॅमर जगापासून लांब आहे पण ती पार्टी आणि फॅशन शोमध्ये नक्की दिसते. मधु सप्रे इटलीत आपला नवरा जियान मारियासोबत राहते. 2012 मध्ये इंदिरा या तिच्या मुलीने जन्म घेतला.