India Highest Paid Singer: भारतीय चित्रपटसृष्टी कोटी कोटींची उद्घाटन घेतानाचं चित्र मागील काही वर्षांपासून दिसत आहे. हल्ली चित्रपटांचे यश हे 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लब, 300 कोटी क्लबनुसार मोजले जाते. हल्ली तर 1 हजार कोटींपर्यंत कमाई करणारे चित्रपटही चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटसृष्टीमधील कमाईच्या या लाटेवर सर्वच स्वार झाले असून हिंदी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग असलेल्या गाण्यांवरही या कमाईच्या ट्रेण्डचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच हल्ली गायकही कोट्यावधींचं मानधन स्वीकारत असल्याचं चित्र पहायला मिळतं. हल्ली चित्रपटांची गाणी गाजली की चित्रपट हीट होणार, लोकांच्या लक्षात राहणार असं समीकरण झालं आहे. त्यामुळेच गायकांच्या मागण्या आणि मानधनातही मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यपणे हल्ली बॉलीवूडमधील गायक एका गाण्यासाठी अंदाजे 20 लाखांपर्यंतचं मानधन घेतात. मात्र बॉलिवूडमध्ये असा एक गायक आहे जो एका गाण्यासाठी तब्बल 3 कोटींचं मानधन घेतो. होय हे खरं आहे सामन्य गायकांपेक्षा हा गायक तब्बल 10 पट अधिक रक्कम घेतो. याच गायकाबद्दल जाणून घेऊयात...


कोण घेतं एका गाण्यासाठी 3 कोटी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सामान्यपणे कोणताही गायक किमान 5 ते 10 लाखांपासून मानधन आकारण्यास सुरुवात करतो. भारतीय संगीत क्षेत्रातील काही अव्वल गायक आणि गायिका एका गाण्यासाठी 20 लाखांपर्यंतही मानधन घेतात. पण एक गायक प्रत्येक गाण्यासाठी कोट्यावधींचं मानधन घेतो. हा गायक आणि संगीतकार म्हणजे ए. आर. रेहमान. समोर आलेल्या बातम्यांनुसार ए. आर. रेहमान एका गाण्यासाठी 3 कोटींचं मानधन घेतो.


5 कोटी घेतल्याचीही चर्चा पण...


काही मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांनुसार रेहमानने अगदी एका गाण्यासाठी 5 कोटींपर्यंतच मानधनही घेतलं आहे. मात्र या 5 कोटीच्या दाव्यांबद्दलची सत्यता कधीच पडताळून पाहण्यात आली नाही. मात्र मनोरंजनसृष्टीमधील सूत्रांच्या माहितीनुसार ए. आर. रेहमान नक्कीच इतर कोणत्याही गायकापेक्षा अनेक पटींनी अधिक रक्कम मानधन म्हणून घेतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये लाइव्ह गाण्यासाठी किंवा प्रत्यक्षात एखादं गाणं गाण्यासाठीही रेहमान अगदी 1 कोटींपर्यंत मानधन घेतो. भारतामधील कोणत्याही गायकडून घेतलं जाणारं हे सर्वाधिक मानधन आहे.


इतर कलाकारांचं मानधन किती?


रेहमानबरोबरच श्रेया घोषालही प्रत्येक गाण्यासाठी चांगलेच मानधन घेते असं दिसून येतं. श्रेया एका गाण्यासाठी 25 लाखांपर्यंत मानधन घेते. सुनिधी चौहान, अरिजीत सिंग एका गाण्यासाठी 20 ते 22 लाखांचं मानधन आकारतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांच्या यादीमध्ये सोनू निगम आणि बादशाह सारख्या गायकांचाही समावेश आहे. सोनू निगम तसेच बादशाह हे दोघेही साधारण 18 ते 20 लाख प्रति गाणं या दराने मानधन आकारतात.


शान, नेहा कक्कर, मिल्खा सिंग, हनी सिंग यासारखे गायकही किमान 10 लाखांच्यावरच मानधन स्वीकारतात.