नवी दिल्ली : तिसरी मॅच जिंकण्याच टीम इंडियासमोर मोठ आव्हान आहे.   दिनेश कार्तिक वांडर्समध्ये टीम इंडियासोबत प्रॅक्टीस करताना दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याला संधी मिळण्याची चिन्ह होती.  दिनेश कार्तिक आणि जुना मित्र मुरली विजयसोबत एकत्र ड्रेसिंग रूममध्ये दिसल्याने जुन्या चर्चा पुन्हा पुन्हा रंगू लागल्या आहेत. 
 
 तामिळनाडुचा स्टार  विकेटकिपर दिनेश कार्तिक आणि टीम इंडियाचा ओपनर मुरली विजय एकेकाळी खूप चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. 


कार्तिकची बायको आणि मुरली विजयचे प्रेम 


 रिपोर्टनुसार इंडियाचा टेस्ट ओपनर मुरली विजयसोबत निकिताचे संबध वाढत गेले. २०१२ च्या आयपीएल ५ दरम्यान दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजयच्या अफेयरच्या चर्चा समोर आल्या. कार्तिकला हे समजल्यावर त्याने निकिताशी घटस्फोट घेतला. 


दोघांची मैत्री तुटली


२०१२ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मुरली विजयसोबत तिने लग्न केले.  साधारण ५ वर्षे चाललेल्या अफेअरनंतर २००७ मध्ये दिनेश कार्तिकने लग्न केले.


पण २०१२ मध्ये दोघांच नातं तुटल.विजय आणि कार्तिकची मैत्रीदेखील तुटली. 


मुरली तिसऱ्यांदा बाबा


मुरली विजय तिसऱ्या वेळेस बाबा बनला आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुरली विजयची पत्नी निकिताने तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे.


कार्तिकचे दुसरे लग्न 


पत्नी निकितासोबत झालेल्या घटस्फोटानंतर दिनेशच्या आयुष्यात इंटरनॅशनल स्कॉश प्लेयर दिपिका पल्लीकलची एन्ट्री झाली. २०१३ मध्ये त्यांची ओळख झाली होती. 


साधारण दोन वर्षांच्या अफेयरनंतर दिनेश कार्तिक आणि दिपिका यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये लग्न केले. दीपिका ख्रिश्चन तर दिनेश हिंदू आहे.दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजानुसार त्यांनी दोनदा लग्न केले.


८ वर्षांनतर कार्तिकचे पुनरागम 


साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन मॅच टीम इंडिया हरली आहे. त्यामूळे व्हाइटवॉशची नामुश्की टाळण्यासाठी इंडियाला चांगला खेळ करणे गरजेचे आहे. 


तिसऱ्या कसोटीत दिनेश कार्तिक ८ वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन झाले असते. दरम्यान त्याने आपली शेवटची टेस्ट मॅच २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती.


कार्तिक २००४ मध्ये आपला टेस्ट डेब्यू करत २३ टेस्ट मॅच खेळत १००० रन्स बनविले. (सर्व फोटो- मुरली विजय आणि दिनेश कार्तिक इन्स्टाग्राम)