मुंबई:अभिनेता आणि नेता कमल हसनचा सिनेमा इंडियन २चा नविन पोस्टर रिलीज झाला. पोस्टर मध्ये कमल हसन एका वृद्ध इसमाच्या भूमिकेत दिसतोय. एस.शंकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.१९९४ साली आलेल्या इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे शूक्रवार पासून सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे. एस शंकरने सिनेमाचे पोस्टर स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. इंडियन सिनेमामध्ये कमल हसनने दुहेरी भूमिका पार पाडली होती. ते वडील आणि मुलाच्या भूमिकेत झळकले. बराच काळ पडद्यावर न दिसणाऱ्या मनीषा कोइराला आणि उर्मिला मातोंडकर इंडियन २ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकंच्या भेटीस येणार आहेत. सिनेमामध्ये अक्षय कुमार खलनायकाची भूमिका करणार असल्याची चर्चा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



अजय देवगनला सिनेमासाठी प्रथम विचारण्यात आले होते. पण काही कारणास्तव अजयने सिनेमा करण्यास नकार दिला. अजय सिंघम सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने सिनेमा करण्यास नकार दिला. 


कदाचित इंडियन २ हा कमल हसनचा शेवटचा सिनेमा असण्याची  शक्यता आहे.एका मुलाखतीत त्यांनी अभिनय सोडत असल्याचे सांगितले. राजकारण आणि सिनेमा दोन्ही गोष्टी एकत्र करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांना राजकारणावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे इंडियन २ हा त्यांचा शेवटचा सिनेमा असू शकतो.