मुंबई : पती- पत्नीच्या नात्याला एक वेगळंच महत्त्वं प्राप्त असतं. कोणासाठी ते निस्सीम प्रेम असतं तर कोणासाठी सर्वस्व. अशा या नात्यातील आनंद आणि एकमेकांची असणारी साथ, विश्वास या सर्व गोष्टींना आणखी महत्त्वं प्राप्त होतं ते म्हणजे सण- उत्सवांच्या निमित्ताने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नात्यातील गोडवा जपणारा असाच एक सण म्हणजे करवा चौथ. 


संपूर्ण उत्तर भारतात विवाहित महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि नात्यात असणाऱ्या प्रेमापोटी हे व्रत ठेवतात. 


दिवसभराच्या निर्जळी उपवासानंतर चंद्राच्या दर्शनानंतर आपल्या पतीचा चेहरा पाहून हा उपवास सोडला जातो. 


यंदाच्या वर्षी सेलिब्रिटी विश्वात अनेक नव्या जोडप्यांनी हा उपवास केला. यामध्ये सोशल मीडियावर चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली. 


आपल्या दमदार खेळीने क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराटसाठी अनुष्काने हा उपवास ठेवला होता. 


चंद्राचं दर्शन घेत तिने उपवास सोडला. ज्यानंतर या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुरेख असे फोटो शेअर करत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या. 



एकमेकांचं सर्वस्व असल्याचं म्हणत त्याच आशयाचं कॅप्शन विरुष्काने फोटोला दिलं. मुख्य म्हणजे या फोटोमध्ये त्यांनी चंद्रालाही समाविष्ट करुन घेतलं. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला खरंच चंद्राची साक्ष होती असं म्हणायला हरकत नाही.