मुंबई : Indian Idol च्या 11 व्या सिझनची अंतिम फेरी अतिशय धुमधडाक्यात साजरा झाला. संगीताच्या या महासंग्रामात सुरांच्या महारथींसोबत 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली. इंडियन आयडॉलचा हा सिझन बराच काळ चालला. या सिझनचा विजयी किताब सनी हिंदुस्तानीने पटकावला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीब कुटुंबातून येणारा सन्नी आपल्या उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. तर सन्नीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. गरीब कुटुंबातील सन्नीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावल्याने त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर महाराष्ट्राच्या रोहित राऊतने दुसरा क्रमांक पटकावला आहे. 


सन्नीला इंडियन आयडॉल 11 च्या ट्रॉफीसोबत 25 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं असून नवी कोरी टाटा अल्ट्रॉज कार देखील देण्यात आली. तसेच टीसीरीजच्या आगामी सिनेमात गाणं गाण्याची संधी देण्यात येणार आहे. सनी हिंदुस्तानी या बुट पॉलिश करणाऱ्या तरूणाने हे पहिलं पारितोषिक मिळवलं आहे. याची सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. कुणाकडूनही संगीताचं ज्ञान न घेता फक्त गाणं ऐकून शिकल्यामुळे सन्नीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 



तर पहिल्या आणि दुसऱ्या रनर-अपला 5-5 लाख देण्यात आले. पहिला रनर-अप रोहित राऊत तर दुसरा रनर-अप ओंकना मुखर्जी राहिला आहे.