मुंबई : प्रसिद्ध म्युझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडल सीझन 12 पुन्हा एकदा विकेंन्डला धमाल करणार आहे. विकेन्डला  किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार सहभागी होणार आहे. कारण यावेळी दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या 100 गाण्यांचा खास भाग प्रसारीत होत आहे. या दरम्यान अमितने अनेक रंजक किस्से सांगितले. आज अमितने अशी एक कथा सांगितली, जी ऐकून सर्वजण थक्क झाले. रविवारी एपिसोडची सुरुवात आशीष कुलकर्णी पासून झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिषने बरीच गाणी गायली ज्यात 'ये जो मोहब्बत है' या गाण्याचा देखील सहभाग होता. आशिषच्या परफॉर्मन्सनंतर अमितने या गाण्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, ''आम्ही वडिलांसोबत निघालो होतो.


ही माझी परदेशातील पहिली ट्रिप होती. त्यावेळी वडील परफॉर्मन्स देत होते, जे पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. बाबा एकामागून एक गाणं गात होते. त्यावेळी खाली एक बंदूक घेऊन एक सुरक्षा कर्मचारी उभा होता. तो अचानक बंदूक घेऊन स्टेजवर आला. आम्ही सर्व घाबरलो.'



अमित पुढे म्हणाला, त्या सुरक्षा कर्मचाऱ्याने वडिलांना सांगितलं की तुम्ही 'ये जो मोहब्बत है'  हे गाणं गायलं नाहीत तर मी तुम्हाला ठार मारीन.' त्यानंतर बाबांनी हे गाणं गायलं 'त्यानंतर, अमितने या गाण्याच्या काही ओळी गायल्या. हिमेशने अमित कुमारचं कौतुक केलं आणि म्हणाला, 'मी तुझ्या आवाजाचा फॅन आहे. तू माझ्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा आहे. ”अमितने उत्तर दिलं, 'तुम्ही हजारो गाणी द्या मी तयार आहे.'


बाबू समझो इशारे बद्दल एक रोचक किस्सा
अमित म्हणाला, "वडील त्याच्या घरी गेले होते. खंडवाला इथे, तिथे घराच्या अंगणात ते बसायचे आणि ते सगळ्यांचं निरीक्षण करायचे. "एक म्हैस तिथून जात होती आणि बंगाली धोतर घालून आलेला माणूस छत्रीने त्या म्हशीला बाजूला करत होता. तो म्हणतो, हट, बाजू, बाजू, बाजू हट. वडिलांनी बाजू- बाजू हा शब्द नोटिस केला. आणि या गाण्याला बाजू या शब्दाने सुरुवात केली. ”हे ऐकून सगळेच आश्चर्यचकीत झाले.


यावेळी अमितने आशिष आणि पवनदीपच्या मैत्रीवर तेरे जैसा यार कहां हे गाणं डेडिकेट केलं. अमित कुमारद्वारे  डेडिकेट केलेलं हे गाणं ऐकून आशिष आणि पवनदीप खूप खुश झाले