मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' फेम अंजली गायकवाड अडचणीत सापडली आहे. इंस्टाग्रामच्या प्रसिद्ध इन्फ्लुएंसरने अंजलीवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. इंफ्लुएंसरचं म्हणणं आहे की, अंजलीने तिचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, अंजलीचं म्हणणे आहे की, तिचं स्वतःचं इन्स्टाग्राम अकाउंट 2 एप्रिल रोजी हॅक झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजलीचं अकाउंट हॅक
मीडियाशी बोलताना अंजलीने सांगितलं की, तिचं इंस्टाग्राम अकाउंट 20-21 दिवसांपूर्वी हॅक झालं आहे. या बदल्यात हॅकर तिच्याकडून 70 हजार रुपयांची मागणी करत आहे. अंजलीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


इन्फ्लुएंसरने शेअर केला स्क्रीनशॉट 
अंजलीवर आरोप करणाऱ्या  इन्फ्लुएंसरने त्याच्या ट्विटर हँडलवर काही स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, कॅप्शनमध्ये तिने इंस्टाग्रामवरील तिच्या व्हेरिफाईड अकाउंटद्वारे अंजलीवर लोकांना तिच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला आहे. स्क्रीनशॉट्सनुसार, अंजलीच्या पीआर टीममधील काही लोकांनी आधी तिच्याशी संपर्क साधला आणि नंतर तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला.


सिंगरला अकाउंट एक्टिविटी विषयीची माहिती नाही
इन्फ्लुएंसर व्यक्तीने अंजलीला खोटं म्हटलं आणि कॅप्शनमध्ये लिहीलं की, कोणतेही सत्यापित खातं जास्त काळ हॅक होऊ शकत नाही. दुसरीकडे, अंजली म्हणाली की, तिच्या अकांऊन्टमधून जे काही घडामोडी घडत आहेत त्याबद्दल तिला काहीच माहिती नाही.