मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय गाण्याचा रिऍलिटी शो 'इंडियन आयडल 12' मध्ये किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. या एपिसोडमध्ये अमित कुमार पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धक आणि परिक्षक यांनी मिळून किशोर कुमार यांची 100 गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Indian Idol 12 : Kishore Kumar Episode Son Amit Kumar Says did it for Money ) मात्र प्रेक्षकांना हा कार्यक्रम रुचला नाही. काही युझर्सने परिक्षकांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. नुकतंच अमित कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. ते फक्त स्पर्धकांचं कौतुक करायला आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशाकरता कार्यक्रमात गेले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,'मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो की, प्रेक्षक या एपिसोडबद्दल खूप बरं-वाईट बोलत आहेत.' त्यांना स्पर्धकांच कौतुक करायला आणलं होतं. मग ते कसे पण गाऊ देत. या एपिसोडमध्ये स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी पैसे देण्यात आले. 



अमित यांनी सांगितली ही गोष्ट 


अमिक म्हणाले की,'मला जी गोष्ट सांगितली. तिच मी केली.' मला सगळ्यांचं कौतुक करण्यास सांगितलं. कुणीही कसंही गायलं तरी त्यांचं कौतुक केलं. कारण ते किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहत होते. मला वाटलं यातून वडिलांना आनंद होईल. पण तसं काही झालं नाही. मी फक्त तेच केलं जे मला सांगितलं. एवढंच काय तर मी स्क्रिप्ट देखील मागितली होती. मात्र ती मला पाठवली देखील नाही.