Indian Idol 12 चा विजेता पवनदीप राजन ऐकेकाळी होता बस ड्रायव्हर?
डोंगराळ रस्त्यावर बस चावलताना पवनदीप राजनचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. यंदाच्या वर्षीचा इंडियन आयडल आपल्याला भेटला आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनॅलेत पवनदीपने त्याच्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. पवनदीप एक उत्तम गायक आहे असं म्हणायला आता हरकत नाही. एक उत्तम गायक, म्युझिशियनसोबत पवनदीप एक चांगला ड्रायव्हार देखील आहे. पवनदीप राजन डोंगराळ रस्त्यावर अतिशय उत्तम प्रकारे बस चालवतो.
बस ड्राईव्ह करत असतानाचा एक व्हिडिओ पवनदीपने युट्यूबवर पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पवनदीप मोठ्या उत्साहात बस ड्राईव्ह करताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये 'गदर' चित्रपटातील 'मै निकला गड्डी लेके' गाणं वाजताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहून पवनदीपचे चाहते म्हणत आहेत की, 'सर्व कामं तुच करशील तर आम्ही काय करू?' दरम्यान पवनदीप खरंच ड्रायव्हर होता का? याबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. पवनदीपचा हा व्हिडिओ 15 एप्रिल 2021चा आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
पार्श्वसंगीतासाठी पवनदीप तयार
सांगायचं झालं तर पवनदीप 2015 साली 'द वॉयस' शोचा विजेता ठरला होता. आता इंडियन आयडलमध्ये येण्याचं कारण वियजी होणे नव्हतं तर नवं काही तरी शिकण्याची इच्छा होती. आता पवनदीपला पूर्ण विश्वास आहे की तो पार्श्वसंगीतासाठी तयार झाला आहे.