मुंबई : 'जूतो के फीते बांधकर, कंधेपे बस्ते लादकर, तुकडी हम बेर्पवाहोकी, चल पडनें को तय्यार हैं...' देशासाठी आपले प्राण पणाला लावणारे सैनिक, झोपेसह कट्टी घेतलेल्या आणि आपल्या जबाबदारीचे चोख पालन करणाऱ्या सैनिकांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. अभिनेता अर्जुन कपूरच्या बहुप्रतिक्षित 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'वंदे मातरम्' असे या गाण्याचं नाव आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ भट्टाचार्य लिखित हे गाणं पपॉन आणि अल्तमस फरीदी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. आतापर्यंत हे गाणं एकूण २८ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिलं आहे. अर्जुनने त्याच्या सोशल अकाउंटवरून 'वंदे मातरम्' गाणं शेअर केलं आहे.



 


त्याचप्रमाणे त्याने स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये तो 'वंदे मातरम्' म्हणजे आपल्या देशाला सलाम करणे आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भारतीय सैनिकांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. 


या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारीत आहे. एका दहशतवाद्याला तावडीत घेण्यासाठी अर्जुन आणि त्याची टोळी कोणत्या प्रकारचे मार्ग वापरतात, या भोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. ओसामाला पकडण्यासाठी सज्ज झालेली ही टोळी भारतातून नेपाळकडे रवाना होते. 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' २३ मे रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.