ओम बिर्लांची कन्या अंजली पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS, आता का आल्यायत चर्चेत?

| Jun 29, 2024, 16:18 PM IST
1/9

ओम बिर्लांची कन्या अंजली पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS, आता का आल्यायत चर्चेत?

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

IAS Anjali Birla: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने कोणताही पेपर किंवा मुलाखत न देता पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलीय, असे आरोप लावले जात आहेत.

2/9

अध्यक्षांची कन्या असल्याचा फायदा?

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

अंजली बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षांची कन्या असल्याचा फायदा झालाय, असे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हे खरे आहे का? असे करणे शक्य आहे का? चला समजून घेऊया. 

3/9

मुलगी अंजली बिर्ला सध्या सोशल मीडियात चर्चेत

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी भारताच्या 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. यासोबतच स्पीकर बिर्ला यांच्या कुटुंबाबाबत सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांची मुलगी अंजली बिर्ला सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. 

4/9

सिव्हिल सर्व्हंट बनण्याची संधी

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

कोटा आणि दिल्लीतून शिक्षण घेतलेल्या अंजली बिर्ला यांना वडिलांच्या प्रभावामुळे यूपीएससी परीक्षा न देता सिव्हिल सर्व्हंट बनण्याची संधी मिळाली, असा आरोप केला जातोय. अंजली बिर्ला यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

5/9

राज्यशास्त्रात पदवी

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

अंजली बिर्ला या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या धाकट्या कन्या आहेत. अंजली यांनी कोटा येथील सोफिया स्कूलमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्र (ऑनर्स) पदवी मिळवली. 

6/9

2019 मध्ये त्यांनी यूपीएससी

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

अंजली बिर्ला यांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2019 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. अंजली यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या त्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत.

7/9

4 ऑगस्ट 2020 रोजी निकाल

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

अंजली बिर्ला यांचा निकाल यूपीएससीच्या साईटवर उपलब्ध आहे. 2019 लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 4 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर झाला. UPAC च्या नियम 16 ​​(4, 5) नुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, आयोग एक राखीव यादी देखील तयार करते. 

8/9

89 मुलांची निवड

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

ज्यामध्ये गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारांनंतर काही विद्यार्थी आहेत. त्यापैकी भारत सरकारच्या कार्मिक विभागातून 89 मुलांची निवड करण्यात आली. ज्यात सभापती ओम बिर्ला यांच्या मुलीचा समावेश आहे. त्यांचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. 

9/9

मुलाखतीत 176 गुण

Success Story IAS Anjali Birla Controversy Inspirational Marathi News

अंजली बिर्ला  यांना UPSC मुख्य परीक्षेत 777 आणि मुलाखतीत 176 गुण मिळाले होते. UPSC 2019 च्या परीक्षेत त्याचें एकूण गुण 953 होते. हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.