Dolly Singh at Cannes 2023: सध्या सगळीकडेच कान्स चित्रपट महोत्सवाची धुम होती. यावेळी मोठमोठ्या सेलिब्रेटींनी तसेच युट्यूबर्सनीही कान्स फेस्टिवलला (Cannes Film Festival) हजेरी लावली होती. यावेळी भारतीय युट्यूबर्सचाही डंका पाहायला मिळाला. सपना चौधरी, डॉली सिंग, निहारिका एनएम आणि रूही दोसानी यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे फक्त सेलिब्रेटीच नाहीत तर यावेळी युटयूबर्सचाही डंका या कान्स महोत्सवात पाहायला मिळाला होता. परंतु बॉलिवूड सेलिब्रेटींपेक्षाही (Bollwyood Celebrity at Cannes) सर्वात जास्त लक्ष कोणी वेधलं असेल तर ते डॉली सिंग हिनं. सध्या तिचे कान्स चित्रपट महोत्सवातील फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी तिनं व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. त्यातून तिनं शरारा आणि चोलीप्रमाणे हा लुक कॅरी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं अबू जानी आणि संदीप खोसला यांचा डिझायनर ड्रेस घातला होता. हा एक विटेंज आऊटफिट (Abu Jani Sandeep Khosala) होता. यावेळी तिच्या स्कर्टला मोती लावलेले होते. त्याचसोबत तिनं फ्लेयर्ड केप आणि मोत्यांनी बनवलेली ब्रालेटही घातली होती. यावेळी तिचा लुक इतका स्टनिंग आणि मस्त होता की तिच्या या लुकनं बॉलिवूड सेलिब्रेटींनाही कॉम्प्लेक्स आला होता. अबू जानी आणि संदीप खोसला हे 1986 सालापासून फॅशन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक सेलिब्रेटींना त्यांच्या हटके आऊटफिटनी सजवलं आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या ड्रेसची कायमच चर्चा होताना दिसते. 


यावेळी तिनं या हटके आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर (Red Carpet) एन्ट्री केली होती. नमस्ते करत तिनं पोझ दिली होती. या ड्रेसवर तिनं सुटेबल असा लुक कॅरी केला होता. तिनं तिचे गाल थोडे ब्लश केले होते. तिनं डोळे मस्काऱ्याप्रमाणे ठेवले होते व न्यूड लिपस्टिक तिनं यावेळी लावली होती. आपल्या या हटके लुकवर तिनं स्टड इयररिंग्स, मॅचिंग ब्रेसलेट्स आणि ट्रान्सपरंट हील्स (White Dress) घातल्या होत्या आणि आपला लुक पुर्ण केला होता. तिचा हा लुक आकर्षक आणि स्टनिंग वाटतं होता. 


हेही वाचा - VIDEO: ''मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!'' नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?



लाइफस्टाईल एशियाशी बोलताना डॉलीनं आपल्या मुलाखतीत सांगितले की ती यावेळी खूप जास्त एक्साईटेड होती. जेव्हा तिला कळलं की कान्समध्ये डेब्यू करणार आहे तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी ती म्हणाली की जागतिक कलाकारांना यावेळी भेटायची संधी मिळेल व त्याचसोबत नेटवर्कही वाढेल. त्याचसोबत आपण ज्या कलाकांरांचे चाहते आहोत त्यांना भेटायची संधीही यावेळी मिळेल. डॉली ही आपल्या इन्टाग्रामवरून सक्रिय असते त्याचसोबत तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरूनही (Dolly Singh Instagram) तिनं आपले हे फोटोज शेअर केले आहेत.