मुंबई : बिग बॉस 9 चा विजेता प्रिन्स नरूला आणि याच शोची स्पर्धक युविका चौधरी हे दोघे ही विवाहबंधनात अडकले आहेत. पंजाबी पद्धतीने हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नाचे सगळे कार्यक्रम मुंबईत पार पडले. गुरूवारी प्रिन्स नरूलाच्या चंदीगडच्या घरात दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात युविकाने मरून आणि गोल्डन रंगाचा लहंगा घातला आहे. तर प्रिन्सने व्हाइट आणि गोल्डन रंगाची शेरवानी घातली आहे. या लग्नाला बिग बॉस आणि रोडीजचे अनेक स्पर्धक उपस्थित होते. तसेच बी टाऊनचे तब्बू, सोहेल खान आणि सुनील शेट्टी देखील पोहोचले होते.  त्याचप्रमाणे नेहा धुपिया आणि क्रिकेटर इरफान पठान देखील सहभागी झाले होते. 





या लग्नाला रोडीज होस्ट आणि अभिनेता रणविजय आला होता. या अगोदर युविकाच्या मेहंदीचा फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्याने ग्रीन रंगाचा लहंगा घातला होता. प्रिन्स नरूलाने आतापर्यंत बिग बॉस 12 सोबतच रोडीज 12 आणि अल्टीमेट रोडीजच्या विजयाचा किताब जिंकला आहे.