'अस्माकम ग्रामस्य स्वागत:' एक असं गाव जिथं संस्कृत बोलीभाषा; भाडणंसुद्धा याच भाषेत...
अजूनही अशी एक जागा आहे, जिथे संस्कृत व्यवहारात वापरतात. अगदी भांडतानासूद्धा हे लोक संस्कृतमध्येच ओरडतात. जाणून घ्या या जागेबद्दल. .
भारत हा बहुभाषिक देश असून देशाच्य संविधानात 22 भाषांचा उल्लेख आहे . ज्यामध्ये बोलीभाषांचा समावेश नाही. प्रत्येक नमूद भाषेला तिच्या उपभाषा आहे. आतापर्यंत ज्ञात असलेल्या 780 बोलीभाषा आहेत. भारतात भाषिक वैविध्यता इतकी आहे की, आपल्याला भाषेवरुन विविध भाषिकांमध्ये वाद होताना दिसतात. भाषेच्या स्पष्टोक्तीवरून वाद होत असतानाच हा वाद तर सतत ऐकायला मिळतो. भाषाशास्त्रज्ञ या वादांना निष्कारणी वाद म्हणतात, त्यांच्यामते भाषा आणि बोलीभाषा असे प्रकार असतात. स्पष्ट- अस्पष्ट असे भाषेत काही नसते .
संस्कृत भाषा
![संस्कृत भाषा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794070-mathurrrliabraarryyy.jpg)
भारतात दर 4 मैलावर भाषा बदलते असे म्हणतात. देशात अशाही काही भाषा आहेत ज्या आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. भारतीयांना संस्कृत भाषेचा किती अभिमान असला तरी, ती कालबाह्य होत चालली आहे . संस्कृत पूजा- पाठ आणि मंत्रांमध्ये वापरली जाते . मात्र संवादासाठी वापरली जात नाही. संस्कृत भाषिकांची संख्या देखील कमी होत चालली आहे. विदेशातसुद्धा संस्कृत शिकणारे लोक असले तरी, ती व्यवहारिक भाषा नाही. पण, भारतात एक असे गाव आहे, जिथे दैनंदिन जीवनातील संवादही संस्कृतमधून साधले जातात.
भुतकाळात जगणारे गाव
![भुतकाळात जगणारे गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794072-mathurrrcyclee.jpg)
देवभाषा
![देवभाषा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794062-mathurrriveerrsideestuddyy.jpg)
मथूर गाव
![मथूर गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794058-mathurrriveerr.jpg)
या गावाचे नाव 'मथूर' आहे. कर्नाटकातील शिमोगा तालुक्यात हे गाव स्थित आहे. तुंगा नदीच्या कुशीत वसलेले हे गाव, निसर्गसौंदर्याने परिपुर्ण आहे. कन्नड भाषासुद्धा येथे वापरली जाते. लोक कन्नड आणि संस्कृत अत्यंत अस्खलित बोलतात. सुमारे 600 वर्षांपुर्वी केरळवरून 'संकेठी ब्राह्मण' समाज मथूरला जाऊन स्थित झाला आणि त्यांनी संस्कृत शिकवायला सुरूवात केली, असे गावकरी सांगतात.
गुरुकुल पद्धती
![गुरुकुल पद्धती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794056-matuurrchildreennss.jpg)
गावाचा इतिहास
![गावाचा इतिहास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794055-mathurrrhommee.jpg)
गावातील लोक सांगतात की , गावात 1980 पर्यंत कन्नड भाषाचं बोलली जायची. संकेठी ब्राह्मण मात्र संस्कृत वापरायचे. गावातील लोकांनी उच्च जातीयांची, भाषा ब्राम्हणांची भाषा अशी भाषेला नावं ठेवली. तेव्हा गावच्या पेजावर मठाचे पुजारी, ज्यांचे नाव 'विश्वेश तिर्थ' असे होते. त्यांनी गावकऱ्यांना तुम्ही शिकाल तर मी संस्कृत शिकवीन, असे आव्हान केले. गावकऱ्यांनीसुद्धा प्रतिसाद दिला. दररोज 2 तास पुजारी गावकऱ्यांना संस्कृत शिकवायचे. आधीपासून कन्नड येत असल्याने अवघ्या, दहा दिवसात गावकऱ्यांना संस्कृत कळायला लागली. अस्खलित बोलता यावं म्हणून , सरावासाठी गावकरी व्यवहारात भाषा वापरू लागले आणि मग तो वापर तसाच चालु राहिला .
उच्च शिक्षित युवक वर्ग
![उच्च शिक्षित युवक वर्ग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794054-mathurrr.jpg)
गावात 'श्री शारदा विलास' नामक शाळा आहे . येथे संस्कृत शिकवली जाते . येथे कन्नड , तमिळ आणि इंग्रजी अशा भाषासूद्धा शिकवल्या जातात . गावातील युवक वर्ग उच्च शिक्षित आहे . गावात अभियंते , वैद्य , शिक्षक , विविध तंत्रज्ञानात पारंगत असलेले लोक राहतात . गावातील विद्यार्थ्यांना कालबाह्य झालेल्या गणित पद्धती वापरता येतात . गावातील गुन्हेगारी दर अत्यंत कमी आहे . गावातील लोकांना समाधानकारक उत्पन्न मिळते . गावात जातीयवाद , उच्चनिच्चता आहे मात्र कालपरत्त्वे ते कमी होईल , असे गावकऱ्यांचे मत आहे .
इतर गावांवर परिणाम
![इतर गावांवर परिणाम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794053-matuurrwommeennss.jpg)