लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग.
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग. पण, प्रत्येक वेळी सर्वांनाच याबाबतची समज असेल याचा अंदाज बांधणं पूर्णपणे चुकीचं. म्हणूनच समाजात अनेकदा काही असे प्रसंग घडतात जे एखाद्याचा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडून टाकतात. एका तरुणीसोबत असंच घडलं होतं. वयाच्या आठव्या वर्षी तिच्या आईवडीलांना त्यांच्या मुलीविषयी नको नको ते ऐकावं लागलं. Humans Of Bombay च्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर या तरुणीची प्रेरणादायी कहाणी सर्वांसाठी पोस्ट करण्यात आली आहे. तिचं नाव यात दिलं नसलं तरीही तिचा प्रवास मात्र खूप काही सांगत आहे. (inspirational story a girl who overcome on obesity and choose career in modelling see breath taking photos)
वजन वाढतच गेलं आणि...
तिच्या पालकांनी समाजाच्या टोमण्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही पण वाढत्या वजनामुळं ती मात्र दिवसागणिक आणखी संकुचित होऊ लागलेली. पाणी जास्त पी, कमी खा... अगं तुझ्याशी लग्न कोण करणार? हे असं ऐकून ऐकून ती स्वत:चाच राग करु लागली. एका वळणावर तर तिनं खाणंपिणं सोडलं आणि जेव्हा खाल्लं तेव्हा त्याला सुमार नव्हता. तिला Bulimia nervosa सारखंच काहीतरी झालं होतं. ही एक अशी अवस्था आहे जिथं तुम्ही सतत खात असता, यामध्ये वाढत्या वजनाकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही.
पालकांची चिंता वाढली आणि...
लेकिची ही अवस्था पाहून अखेर तिच्या पालकांनीच पुढाकार घेत समुपदेशन, ध्यानधारणा अशा गोष्टींचा आधार घेतला. हळुहळू गोष्टी बदलत गेल्या आणि ती महाविद्यालयात जाऊ लागली. तिथेच तिला काही अशी मंडळी भेटली जी पुढे जाऊन तिच्या Best Friends च्या यादीत स्थान भक्कम करुन गेली. तिनं ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि आपल्याला मिळालेली दाद पाहून पुरती भारावली.
हेसुद्धा वाचा : Health Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब?
Body positivity ही संकल्पनाच त्यावेळी नवी होती असं सांगताना आपण याच मुद्द्यावरून ब्लॉगिंग आणि व्लॉगिंगच्या माध्यमातून बोलण्यास सुरुवात केली. इथूनच इंडस्ट्रीमध्ये plus size models वाढण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. Elle magazine ची तिच्यावर नजर पडली आणि एका वळणावर तिनं या मासिकासाठी cover girl म्हणूनही फोटोशूट केलं.
आज वयाच्या 31 व्या वर्षी तिनं स्वत:शीच खास नातं तपलं असून, हा आपल्याच शरीराला जपण्याचा, दाद देण्याचा एक मार्ग असल्याचं ती जाणिवपूर्वक सांगते. आपल्यावर ज्या प्रमाणे निशाणा साधला गेला, तसं आणखी कोणासोबतही घडू नये हीच आशा व्यक्त करत ती सध्या मुलांना स्वत:चा स्वाभिमान जपण्याविषयी शिकवू इच्छिते. समाजाची साथ तिला सुरुवातीला नाही मिळाली, पण ती गोष्ट तिनं बरीचम मागे टाकली..... तुम्ही कसला विचार करताय?