मुंबई : भारतीय रिझर्व बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणचं जेएनयूत जाण्याच्या निर्णयाच समर्थन केलं आहे. त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या 'लिंक्डइन'वर जवळपास 650 शब्दांचा ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये जेएनयू, लोकतंत्र आणि भारताच्या सद्यस्थितीवर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रघुराम राजन यांनी दीपिकासोबतच निवडणुक आयुक्त अशोक लवासा यांचं देखील कौतुक केलं आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय की,'JNU मध्ये दीपिकाने शांतीपूर्व दर्शवलेला विरोध हा काही लोकांसाठी सत्य, आझादी आणि न्याय. हे केवळ शब्दच नाहीत तर यासाठी ते त्यागही करू शकतात. 


पुढे ते असं देखील म्हणाले की,'आंदोलनात आपल्याला पहायला मिळालं की, कसे युवा हिंदू-मुस्लिम या गोष्टींचा विचार न करता एकमेकांसोबत खांद्याला खादा लावून तिरंग्याच्या पाठी चालत जात आहेत. या तरूणाईने राजकारणाने तयार केलेले कृत्रिम तुकड्यांना नाकारलं आहे. या तरूण पिढीने दाखवून दिलं आहे की, आमच्यामध्ये अजूनी संविधानाचा उत्साह आहे.'


तसेच ते म्हणाले की,'जेएनयूमधील विद्यार्थ्यांना भेटून मौन धारण करत दीपिकाने विरोध दर्शवला. तिच्या या कृतीचं कुठे कौतुक होतंय तर कुठे याला विरोध दर्शवला जात आहे. छपाक या आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच तिने स्वतःला संकटात टाकलं आहे. त्यामुळे आता कोणत्या गोष्टी अडचणीत येणार याकडेच सगळ्यांच लक्ष आहे.'