लिव इन रिलेशनबद्दल आलिया भट्ट म्हणते...
मुलांबद्दल आलिया म्हणते की...
मुंबई : 'राझी' मधील आपल्या दमदार अभिनयानंतर सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्टच भरभरून कौतुक होत आहे. आता तिचा आगामी प्रोजेक्ट देखील तिचा चर्चेत आहे. 'ब्रम्हास्त्र' या सिनेमांतून आलिया भट्ट अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आता रणबीरचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला माहित आहे. रणबीर आणि आलिया यांच्या काही तरी खास नातं असल्याची चर्चा रंगली आहे. रणबीरने आपलं नातं वेगळं असल्याचं मान्य देखील केलं.
काही दिवसांपूर्वी आलिया चाहत्यांनी 30 च्या अगोदरच लग्न करू सुखद धक्का देईल असं देखील म्हटलं होतं. तर आता 25 वर्षाची आलिया भट्ट चक्क लिव इन रिलेशन आणि मुलं या विषयावर अगदी मोकळेपणाने बोलली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आलिया चर्चेत आली आहे. हे पण वाचा : आलिया भट्टचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कत्याच एका कार्यक्रमात आलिया भट्ट लिव इन आणि मुलांबद्दल बोलली आहे. 30 च्या अगोदर लग्न करून मी चाहत्यांना सरप्राईज देईन. पुढे ती म्हणाली की, माझा पूर्ण विश्वास आहे. मुलांना जन्म देण्यासाठी लग्न करणं महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा कधीही मी मुलांचा विचार करेन तेव्हा मी नक्की लग्न करेन असं आलिया म्हणाली.