मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ही ब-याच काळापासून पडद्यावर दिसली नसली तरी तिची लोकप्रित कमी झालेली नाहीये. आज करिनाचा ३७वा वाढदिवस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्याशी संबंधीत अनेक गोष्टींची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच काही तिच्या जीवनातील खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


- सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याआधी करिना कपूर ही शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा एक किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती.


- सैफ आणि करिनाची लव्हस्टोरी ‘टशन’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुरू झाली होती. त्यानंतर दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं.  


- करिना आणि सैफने आधी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर एका शानदार रिशेप्शन पार्टी देण्यात आली होती. 


- करिनाने तिच्या लग्नात तोच लेहंगा घातला होता जो तिची सासू आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात घातला होता. लग्नानंतरचा हा त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. 


- डिझायनर ॠतु कुमारने ५० लाख रूपये किंमतीचा शरारा रिडिझाईन केला होता. या शरा-यासोबत करिनाने ४० लाखांचा नेकलेसही घातला होता.