मुंबई: कोलंबियाची सुपर पॉपस्टार शकीराला कोण नाही ओळखत. खास करून काही वर्षांपूर्व झालेल्या फीफा वर्ल्डकपदरम्यान तिला परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे तिचे नाव सर्वांच्या ओठावर आले. आज ती एक यशस्वी पॉपस्टार आहे. खरे तर ती काही सर्वसामन्य कुटुंबातील मुलगी नाही. तिचा जन्म तसा श्रीमंत कुटुंबातला. पण, कुटुंबाचा व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे घराला अवकळा आली. घरासहीत घरातले साहित्यही विकण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर आली. त्यातूनच पुढे सुरू झाला तिचा खरा संघर्ष......


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे घराला आलेली अवकळा पाहून शकीरा प्रचंड उदास झाली. तिला प्रचंड नैराश्य आले. तिला या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी कुटुंबियानी तिची भेट गरिब मुलांसोबत घालून दिली. या मुलांना पाहून तिने ठरवले की आपण कलाकार व्हायचे. पुढे यशस्वी कलाकार झाल्यावर गरीब मुलांसाठी काहीतरी करायचे. 


भारावून गेलेल्या शकीराने वयाच्या आठव्या वर्षी स्वत: संगित निर्मिती करण्यास सुरूवात केली. ती गाणेही लिहित असे आणि त्या गाण्याला स्वत: चालीही लावत असे. वायाच्या १०व्या वर्षी शकीराने आपल्या शाळेत एका ग्रूपमध्ये गाणे गायले. पण, तिचा आवाज एखाद्या बकरीसारखी असल्याचे सांगून तिला गाणे गाण्यापासून रोखण्यात आले. पण, शकीराने हार मानली नाही. ती पुन्हा तयार झाली पुढील प्रवासासाठी.


म्यूझीक इंडस्ट्रीत आल्यावर शकीराचे पहिले दोन अल्बम सुपर फ्लॉप झाले. पण, तिचा तिसरा अल्बम मात्र तिला चांगलेच यश देऊन गेला. १८व्या वर्षी तिने  Pies Descalzos नावाची संस्था सुरू केली. ही संस्था गरिब विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांना मदत करते. शकीराने २०१०मध्ये फीफा वर्ल्डकपचे थीम सॉन्ग ऑफिशिअली गायले आणि ते रातोरात प्रचंड सुपरहिट झाले. हे सॉंन्ग युट्यूबवर असंख्य लोकांनी पाहिले आहे.