मुंबई :  सुमारे १७ वर्षांनंतर मानुषी छिल्लर या २० वर्षीय भारतीय  युवतीने ' मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस वर्ल्ड' हा किताब सौंदर्यवतींसाठी जितका मानाचा आहे. तितकेच या स्पर्धेच्या वेळेस त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, सांस्ककृतिक कार्याचा विचार  करून निकष लावला जातो. 'या' प्रश्नाचं उत्तर देत मानुषी ठरली विश्वसुंदरी


मानुषी छिल्लर ही  युवती वैद्यकीय क्षेत्रात आहे. ती मेडीसीनची विद्यार्थिनी आहे. 'भगत फूल सिंघ गर्व्हनमेंट मेडिकल कॉलेज'ची  विद्यार्थिनी आहे. मानुषीला कार्डिएड सर्जन होण्याची इच्छा आहे.  



 


मिस वर्ल्ड २०१७ च्या ब्युटी विथ पर्पसच्या प्रोजेक्टसाठी मानुषीनं मासिकपाळीच्या दिवसांमधील स्वच्छता हा विषय निवडला होता. 'प्रोजेक्ट शक्ती' द्वारा मानुषीने मासिकपाळीच्या दिवसातील स्वच्छता यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये तिने २० गावांना भेट दिली होती. यामध्ये ५००० महिलांचा समावेश होता. 



 


शास्त्रिय नृत्याची आवड असणारी मनुषी अनेक अ‍ॅडव्हेंचर्स खेळांचादेखील आनंद घेते. यामध्ये स्कुबा डायव्हिंग, स्कॉर्किंग, बंजी जंपिंग यांचा समावेश आहे. 


वैद्यकिय क्षेत्राचा वारसा मानुषीच्या घरातूनच मिळाला आहे. मानुषीचे आई वडील डॉक्टर आहेत. 



 


फीटनेस हा केवळ लक्झरीचा भाग नाही. तर प्रत्येकाने स्वतःच्या फीटनेसकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचे आहे. यासाठी मानुषी अगदी मध्यरात्रीदेखील वेळ काढून काही तास व्यायाम करते.  



मानुषी छिल्लर ही व्यायामाप्रमाणेच ब्रेकफास्ट आणि डाएटच्या बाबतीतही दक्ष आहे.  



नक्की वाचा : मानुषी छिल्लरमुळे सर्वाधिक 'मिस वर्ल्ड'च्या यादीमध्ये भारत अव्वलस्थानी