Aamir Khan Ira Khan Rina Dutta Nupur Shikhare at an Event: आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरसह ती रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगलेली असते. आमिर खान आपल्या पुर्वाश्रमीच्या पत्नीसह एका कार्यक्रमादरम्यान दिसला आहे. यावेळी मुलगी आयरा खान आणि होणारा जावई नुपूर शिखरे हे दोघंही उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयरानं पारंपारिक पण मॉडर्न असा लुक केला होता. तिनं काळ्या रंगाची साडी नेसली होती. काळ्या रंगाचा क्लोजनेक फुल हॅण्ड ब्लाऊज परिधान केला होता. तिनं साधा मेकअप केला होता व केस मोकळे सोडले होते. कपाळावर काळ्या रंगांची टिकली लावली होती. तिच्या या साध्याशा लुककडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या. 


तिच्या या काठपदराच्या साडीनं खासकरून महिलावर्गाला आकर्षित केले. तिनं साडीला मॅंचिंग असे झुमके घातले होते. गळ्यात चेन परिधान केली होती. तिच्या हातातील तिची एन्गेजमेंट रिंग यावेळी स्पष्ट दिसत होती. आमिर खानंही साधासा लुक केला होता. त्यानं डेनिमवर शॉर्ट मरून कुर्ता परिधान केला होता. सोबतच शूज घातले होते. रीना दत्ता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर नुपूरनं ब्ल्यू शर्टनर काळ्या रंगाचा हाफ जॅकेट परिधान केला होता.


आमिर खानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. आयराचाही सत्कार करण्यात आला. 



यावेळी अभिनेता आमिर खानला याला सन्मानित करण्यात आले. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)


काही दिवसांपुर्वी अभिनेता आमिर खान चेन्नईच्या पुरात अडकला होता. समोर आलेल्या बातम्यांनुसार तो मुंबई सोडून चेन्नईत राहायला गेल्याचे समजले होते. सध्या बंगालच्या उपसागरात मिचॉंग चक्रीवादळानं हाहाकार माजवला होता. त्याचा मोठा फटका चेन्नईला बसला होता. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्याचसोबत पाणी, वीज यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडाही होता. अभिनेते रजनीकांत यांच्या घराबाहेरही भरपूर पाणी साचले होते. अनेक सुपरस्टार कलाकारांनाही या वादळाचा फटाका बसला होता.  



उजवीकडून रीना दत्ता, नुपूर शिखरे, आमिर खान आणि आयरा खान मुंबई झालेल्या एका कार्यक्रमात दिसले. (फोटो सौजन्य : ट्विटर) 


आमिर खान, रीना दत्ता, नुपूर शिखरे, नुपूर शिखरेची आई, आयरा खान हे सर्वच जण यावेळी एकत्र एका फ्रेममध्ये दिसले. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतायत. पुढच्या वर्षी नाताळमध्ये त्याचा मोठा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.