धोनी, गील, काव्या मारनबरोबर फोटोत झळकलेली ही चश्मिष IPL Mystery Girl आहे तरी कोण?

IPL 2024 Viral Girl With Specs: महेंद्र सिंग धोनी असो, शुभमन गिल असो किंवा युजवेंद्र चहल असो अनेक संघाच्या अनेक क्रिकेटपटूंबरोबर तिचे फोटो यंदाच्या आयपीएल पर्वामध्ये सोशल मीडियावर दिसून आले. इतकच काय कर काही संघ मालकांबरोबर तसेच खेळाडूंच्या पत्नींबरोबरही तिचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. पण ही चश्मिष मुलगी आहे तरी कोण? जाणून घेऊयात..

| May 23, 2024, 12:39 PM IST
1/18

IPL 2024 komal sharma

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने यंदाचं आयपीएलचं पर्व चांगलेच गाजवलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.   

2/18

IPL 2024 komal sharma

अभिषेक बरोबर अनेकदा एक चष्मा घातलेली तरुणी फोटोंमध्ये दिसून आली.

3/18

IPL 2024 komal sharma

खरं तर यंदाच्या पर्वात ही तरुणी इतरही अनेक संघांच्या अनेक वेगवेगळ्या क्रिकेटपटूंबरोबर दिसून आली.  

4/18

IPL 2024 komal sharma

अगदी चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबरोबरही या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.  

5/18

IPL 2024 komal sharma

तिचा चहलबरोबरच्या फोटोचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली.

6/18

IPL 2024 komal sharma

अभिषेकच नाही तर अभिषेकच्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सबरोबरचा या तरुणीचा फोटोंनेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.  

7/18

IPL 2024 komal sharma

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलबरोबरचा या तरुणीचा फोटोही चांगलाच चर्चेत राहिला.  

8/18

IPL 2024 komal sharma

सनरायझर्स हैदराबादच्या संघाची मालकीण काव्या मारनबरोबरही या तरुणीने फोटो काढून घेतला आहे.

9/18

IPL 2024 komal sharma

ही चष्मा घातलेली तरुणी कोण जिचे अनेक क्रिकेटपटूंबरोबर फोटो आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या तरुणीचं नाव कोमल शर्मा असं आहे.  

10/18

IPL 2024 komal sharma

आता ही कोमल शर्मा कोण आहे तर कोमल ही सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेकची सख्खी थोरली बहीण आहे.  

11/18

IPL 2024 komal sharma

सामना जिंकल्यानंतर अभिषेक अनेकदा त्याच्या आई आणि बहिणीबरोबर मैदानात विजय साजरा करताना दिसला.  

12/18

IPL 2024 komal sharma

अभिषेकला त्याच्या बहिणीने म्हणजेच कोमलने पहिल्यांदा प्रत्यक्षात यंदाच्या आयपीएलमध्येच क्रिकेट खेळता पाहिलं.  

13/18

IPL 2024 komal sharma

अभिषेकमुळेच कोमलला यंदाच्या पर्वात अनेक क्रिकेटपटूंबरोबर फोटो काढण्याची संधी मिळाली.  

14/18

IPL 2024 komal sharma

कोमलचा जन्म 20 मार्च 1994 चा असून ती 30 वर्षांची आहे.  

15/18

IPL 2024 komal sharma

कोमल अभिषेकपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. अभिषेकचा जन्म 4 सप्टेंबर 2000 चा आहे.  

16/18

IPL 2024 komal sharma

कोमल शर्माने अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठामधून सायकोथेरिपीमध्ये बॅचलर्स डिग्री घेतली आहे.  

17/18

IPL 2024 komal sharma

पुढे कोमलने जयपूरमधील एनआयएमएसमधून याच विषयात मास्टर्स डिग्री घेतली आहे.  

18/18

IPL 2024 komal sharma

अमृतसरमधील एसजीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये कोमल सायकोथेरिपीस्ट म्हणून कार्यरत आहे.