इरफान खानचे स्वप्न होणार पुर्ण, मुलाचा मोठा निर्णय
पण अभिनयातील करिअरसाठी त्याने शिक्षण सोडत...
मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान अनेकदा सोशल मिडियावर चर्चेत असतो. तो बऱ्याचदा बाबा इरफान खान यांच्यासोबत घालवलेले खास क्षण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो. कधी बाबिल इरफान यांनी दिलेल्या शिकवणींच्या आठवणीमध्ये रमतो, तर कधी त्याला बाबांसोबत घालवलेला क्वालिटी टाईम आठवतो.त्याच्या पोस्टवर बऱ्याचदा कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो.
आता बाबांच्या प्रेमापोटी बाबिलने एक मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. आतापर्यंत अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांच्या मुलींना आपलं करिअर अभिनय क्षेत्रातच करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक स्टार किड बॉलिवूडला मिळाले आहेत. पण वडिलांच्या किंवा आईंच्या प्रसिद्धीचा फायदा या स्टार किडला झाला म्हणून ते इंडस्ट्रीत टिकू शकले अशी ही एकीकडे मग चर्चा व्हायला सुरुवात होते..
त्यात आता बाबिलने ही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं नुकतच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही खास घोषणा केली आहे. बाबिल युकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून चित्रपट अभ्यासात ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ ही पदवी घेत होता. पण अभिनयातील करिअरसाठी त्याने शिक्षण सोडत असल्याची पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, "माझ्या प्रिय मित्रांनो मला तुमची खूप आठवण येईल. माझे मुंबईत फक्त एक-दोन मित्र आहेत. आपण सर्वांनी मला दुसर्या देशात राहण्यास उद्युक्त केलं. धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो."
पुढे तो लिहितो, "आज मी ‘फिल्म बीए’ सोडतो आहे, कारण आता मला माझं पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करायचं आहे. गुडबाय वेस्टमिन्स्टर विद्यापीठ."
बाबिल लवकरच नेटफ्लिक्सच्या क्वाला मधून डेब्यु करणार आहे.