`माझ्या मुलाला सोडा`; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये
Irfaan Khan Son Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान डिप्रेशनचा शिकार; आई सुतापा सगळ्यांना विनंती करत म्हणाली...
Irfaan Khan Son Babil Khan Fight With Depression: दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा सध्या कठीण काळातून जात आहे. त्यावर खूप प्रेशर असून तो जवळपास डिप्रेशनमध्ये गेला आहे. याचा खुलासा त्याची आई आणि लेखिका-निर्माता सुतापा सिकदरनं केला आहे. सुतापानं दिलेल्या माहितीनुसार, इरफान खानसोबत त्याची तुलना करण्यात येण्याचा बाबिलला त्रास होतोय. त्यातही अजूनही त्यांचं कुटुंब हे इरफान खान यांच्या निधनाध्या धक्क्यातून बाहेर आलेलं नाही.
सुतापा सिकदरनं 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बाबिलवर खूप जास्त प्रेशर आहे आणि मला ते योग्य वाटत नाही. इतकं प्रेशर नसायला हवं. इरफानवर कधीच हे प्रेशर नव्हतं. जेव्हा तुमच्यावर कोणतं प्रेशर नसतं तेव्हा तुमची खरी ओळख सगळ्यांसमोर येते. मुद्दा हा फक्त कामाचा नाही, तर वडिलांना गमावण्याचं देखील दु:ख आहे.
सुतापा सिकदरनं पुढे सांगितलं की 'तो आता जवळपास पूर्ण डिप्रेशनमध्ये आहे. त्याला या सततचा तणाव आणि तुलना सतत पाहायला मिळते. कृपया माझ्या मुलाला सोडा. तो आता ढासळलाय आणि त्याच्यात आता लढण्याची ताकद देखील शिल्लक राहिली नाही. त्याचे वडील हे मजबूत होते आणि मी देखील, पण आमच्या पूर्वजांनकडून आलं असेल.'
सुतापानं पुढे उदाहरण देत सांगितलं की 'आता अभिषेक बच्चननं जसं I Want To Talk मध्ये चांगलं काम केलं, पण ते आहेच की अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुलना करण्यात आली, त्यानं उत्तम अभिनय करणं परत त्याच्या विरोधात गेलं. मला वाटतं की बाबिल देखील या सगळ्यातून जातोय. आशा करते की लवकरच तो यातून बाहेर येईल.'
हेही वाचा : 'तू लढ...'; EX- पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्याच दिवशी समांथाची पोस्ट
बाबिलनं त्याच्या करिअरची सुरुवात ही एक कॅमेरा असिस्टंट म्हणून केली होती. 2022 मध्ये त्यानं 'कला' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तो 'फ्राइडे नाइट प्लान' आणि 'द रेल्वे मॅन' या चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसला. या तिन्ही प्रोजेक्ट्समधील त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. मात्र, काहीही झालं तरी अनेकदा लोकांनी त्याची तुलना ही त्याचे दिवंगत वडील इरफान खानसोबत केली.