मंबई : 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने या जगाला निरोप दिला. आपल्या अभिनयामुळे इरफानने स्टार-स्टड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती, ज्यामुळे त्याला कधीच कोणत्याही आडनावाची गरज पडली नाही. सिनेमांत आपली भूमिका निभवताना जितका सहज दिसायचा. तितकाच तो खऱ्या आयुष्यातदेखील सहज होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013मधील प्रसिद्ध आणि प्रशंसित सिनेमा 'किस्सा' इरफानच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आठवणीत आहे. चित्रपटामध्ये इरफानसोबत असलेली सह-अभिनेत्री रसिका दुग्गल त्याच्या साध्या आणि सहज व्यक्तिमत्वाची आठवण काढून भावूक होते. या चित्रपटात रसिकाने इरफानच्या सूनेची भूमिका साकारली होती.


'किस्सा'च्या क्लायमॅक्समध्ये इरफान आणि रसिका यांच्यात खूप कठीण सीन चित्रित करण्यात आला होता. या सीनमुळे रसिकाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं, ज्याचं पूर्ण श्रेय तीने इरफानला दिलं आहे. इरफानबरोबरच्या त्या सीनची संपूर्ण कहाणी रसिकाने एका मुलाखतीत सांगितली होती


रसिका म्हणाली, 'जेव्हा जेव्हा कोणी मला या किस्साबद्दल बोलतं तेव्हा मला खूप आनंद होतो. मी आभारी आहे. तुम्ही तो चित्रपट पाहिला असेल आणि तो चित्रपट तुम्हाला आठवत असेल. माझ्या कारकिर्दीतला हा खूप महत्वाचा चित्रपट आहे. आणि इरफ़ान, तिलोत्तमा शोम, टिस्का चोपड़ा आणि डायरेक्टर अनूप सिंह हा या चित्रपटातील महत्त्वाचं कारण आहे.


कारण या बड्यास्टार कास्टसोबत मला स्क्रिन शेअर करता आली. 'किस्सा'च्या माध्यमातून मला पहिल्यांदा असं एहसास करायचा मौका मिळाला की, आपल्या परफॉर्मेंन्सची किती महत्वाचा असतो. याबद्दल मी नेहमी इरफानची आभारी राहीन.